शंकर उत्तम सुर्वे (रा. नरसिंगपूर, ता. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद करण्यात आल्या आहेत. या कालावधीमध्ये अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक अनिल चासकर यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविली जात आहे. गुरुवारी गोळेश्वर येथून दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती निरीक्षक राजेंद्रकुमार पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक राजू खंडागळे, सहायक दुय्यम निरीक्षक सचिन बावकर, जवान विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे यांनी तातडीने सापळा रचून देशी दारूच्या ३८४ बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या शंकर सुर्वे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दारूच्या बाटल्यांसह गुन्ह्यात वापरलेली कार (णमणख १३ एसी १७४५) असा ४ लाख २३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
फोटो : ०३केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाडच्या उत्पादन शुल्कच्या पथकाने दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेऊन अटक केली.