कोरोनाला रोखण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:14+5:302021-04-20T04:39:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंगापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाढत्या गर्दीतून कोरोनाचा फैलाव होऊ नये ...

कोरोनाला रोखण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
अंगापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाढत्या गर्दीतून कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन गावात दहा दिवस टाळेबंदी तथा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत व दक्षता कमिटीतर्फे याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बंदचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. अंगापूर परिसरात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, असे असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांची गर्दी वाढून कोरोनाचा फैलाव होत आहे. ही चिंताजनक बाब असून, हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत व दक्षता कमिटीकडून दिनांक १८ ते २८ एप्रिल या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामपंचायतीकडून ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्तरीय दक्षता कमिटीने बंदचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने दुकानदारांना बंदसंदर्भात आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी शासनाचे सर्व नियम पाळून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ग्रामपंचायतीतर्फे सरपंच वर्षा कणसे व उपसरपंच हणमंत कणसे यांनी दिला आहे.
(पॉइंटर)
बैठकीतील निर्णय
- दहा दिवस सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. विनाकारण रस्त्यावर फिरू नये
- मेडिकल सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते ८ यावेळेत सुरू राहतील
- दूध संकलन केंद्र सुरू राहतील, शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाला स्वत: गावात फिरून विकावा.
- गर्दी न करता पिठाची चक्की सुरू राहील, दहा दिवसांच्या कालावधीत बाहेरील तसेच इतर विक्रेते यांना गावात पूर्ण बंदी आहे.
- तसे आढळल्यास दोन रुपये दंड करण्यात येईल.
(चौकट)
अवैध धंद्याला बंदी...
गावामध्ये मटका तसेच मद्य विक्री यासारख्या अवैध धंद्यांना पूर्णत: बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.