शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
7
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
9
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
10
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
11
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
12
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
13
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
14
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
15
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
16
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
17
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

दुसऱ्यांना अडकवण्यासाठी सख्ख्या बहिणीला जाळले; फिर्यादीच निघाले मारेकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 14:13 IST

Satara Brother killed his sister News: सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह त्यांच्या टीमने सलग तीन दिवस फलटण येथे तळ ठोकून या खून प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले

ठळक मुद्देदुसऱ्यांना अडकविण्यासाठी बहिणीच्या खुनाचा बनाव भाऊच निघाला मारेकरी; एलसीबीकडून कौशल्याने तपास उघड

सातारा: वर्षानुवर्षे जमिनीवरून वाद सुरू असलेल्या विरोधकांना अडकविण्यासाठी सख्ख्या बहिणीच्या खुनाचा सख्ख्या भावाने पत्नीला सोबत घेऊन बनाव केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील आठ जणांना अटक केली आहे.पिंपद्र, ता. फलटण येथे तीन दिवसांपूर्वी महुली झबझब पवार (वय ६०) या महिलेचा पाच ते सहा जणांनी झोपडी जाळून खून केला होता. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाला असल्याची तक्रार महुली पवार यांची भावजय कल्पना पवार (वय ४५) हिने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून पोलिसांनी सहा जणांना अटकही केली. मात्र, अटक केलेल्या संशयित आरोपींकडून पोलिसांना मिळत गेलेल्या माहितीवरून यात नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेला लागली.

सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह त्यांच्या टीमने सलग तीन दिवस फलटण येथे तळ ठोकून या खून प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले. हा सारा प्रकार तपासी अधिकाऱ्यांना समजला तेव्हा अधिकारीही आवाक झाले. महुली पवार ही गेल्या अनेक वर्षांपासून भाऊ अशोक पवार याच्याकडे राहात होती. महुलीचे वयही झालंय. तिचा काही उपयोग नाही. आपण तिला ठार मारले तर याचा आळ आपण जमिनीचा वाद सुरू असलेल्या विरोधकांवर घेऊ आणि त्यांना जेलमध्ये पाठवू. असा भयानक कट महुलीचा भाऊ अशोक आणि भावजय कल्पना हिने रचला. त्या दिवशी महुलीला रानातील झोपडीत नेले.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास माहुलीच्या डोक्यात भावजय कल्पना हिने दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिच्यासह झोपडीला आग लावली. एवढेच नव्हे तर घरातल्या मुलासकट सर्वांनीच स्वत: मारहाणीच्या खुणा दिसाव्यात म्हणून शरीरावर ओरखडे ओढले. एखादा चित्रपटाला शोभेल असा बनाव या कुटुंबाने केला आणि विरोधकांना अडकविण्यासाठी सख्ख्या भावाने बहिणीचा बळी दिला. पण चाणाक्ष पोलिसांनी दुसऱ्यांना खड्डा खणण्यास गेलेल्या भाऊ, भावजय, मुले अशा आठ जणांना गजाआड केले.

पोलिसांनी यातील वस्तुस्थिती समोर आणली नसती तर आठ जणांना नाहक कारागृहात दिवस काढावे लागले असते. हा तपास कौशल्याने उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी एलसीबी टीमचे कौतुक केले.खून नाही केला तरीही ते कारागृहात...भावजय कल्पना पवार हिने आपल्या नणंदेचा खून सहा जणांनी केला असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. खुनासारखी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांनी आठही जणांना तत्काळ अटक केली. मात्र, यातील वस्तूस्थिती समोर आल्यानंतर अटक केलेले सर्वजण निर्दोष निघाले. पण विनाकारण त्यांना जेलची हवा खावी लागली. आता त्यांच्यावरील खुनाचा आरोप मागे घेण्यासाठी स्वत: पोलीसच न्यायालयात अहवाल पाठविणार आहेत. त्यानंतरच त्यांची यातून सुटका होणार आहे. खुनाचा बनाव करणारे हेच ते...कल्पना अशोक पवार, अशोक झबझब पवार, कमांडो उर्फ किमाम अशोक पवार, गोप अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल उर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (सर्व रा. अलगुडेवाडी, ता.फलटण) यांनी वृद्ध महुली पवार हिच्या खुनाचा बनाव रचला. सारे पुरावे या आठ जणांच्या विरोधात पोलिसांना भक्कम मिळाले असून, त्यांना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर