अध्यक्षपदाचा मान ‘माण’लाच?

By Admin | Updated: September 21, 2014 00:37 IST2014-09-21T00:36:44+5:302014-09-21T00:37:04+5:30

जिल्हा परिषद : आज होणार निवड; सव्वा-सव्वा वर्षाची विभागणी

President of the presidency? | अध्यक्षपदाचा मान ‘माण’लाच?

अध्यक्षपदाचा मान ‘माण’लाच?

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदावर पक्षाचे एकमत झाले नसल्याचे मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले असले तरी या पदासाठी माण तालुक्यातील कुकुडवाड गटाचे सदस्य शिवाजीराव शिंदे यांचे नाव राष्ट्रवादीच्या कार्यकारी समितीला पाठविण्याचा निर्णय शनिवारी राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, उपाध्यक्षपद उदयनराजे गटाला द्यायचे की, अमित कदम यांना द्यायचे, याचा निर्णय मात्र होऊ शकला नाही. परिणामी या पदाचा तिढा निवडीपूर्वी एक तास अगोदर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुटणार आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी रविवार, दि. २१ रोजी होणार आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी राष्ट्रवादी भवनात खासदार आणि आमदारांची बैठक झाली. मंत्री शशिकांत शिंदे, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्वच आमदारांनी आपली भूमिका मांडली. अध्यक्षपदासाठी शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, माणिकराव सोनवलकर, आनंदराव शेळके-पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी अमित कदम यांची नावे चर्चेत आहेत. त्या अनुषंगाने कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करायचे, यासाठी राष्ट्रवादीची सुमारे दोन तास खलबते झाली. यानंतर मंत्री शिंदे आणि रामराजेंनी पत्रकारांशी बातचित केली. मंत्री शिंदे म्हणाले, ‘प्रत्येक आमदारांनी आपल्याच उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली आहे. उदयनराजेंनी उपाध्यक्षपद मागितले आहे. गेल्या अडीच वर्षांत जी पदे देण्यात आली, त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना कोठेही संधी देण्यात आलेली नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये, अशी मागणीही उदयनराजेंनी केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उदयनराजे म्हणाले, ‘माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे मी निश्चिंत आहे.

Web Title: President of the presidency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.