शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सध्याची वेळ प्रत्यक्ष मदतीची : पखाले; शेखर गोरेंच्या माध्यमातून कामासाठी पोकलेन मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:22 IST

दहिवडी : ‘माण तालुक्यातील अनेक गावे श्रमदानातून उभी राहिली आहेत. लोकांचे जलसंधारणाबरोबर मनसंधारण होत आहे.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा

दहिवडी : ‘माण तालुक्यातील अनेक गावे श्रमदानातून उभी राहिली आहेत. लोकांचे जलसंधारणाबरोबर मनसंधारण होत आहे. त्यामुळे लोकांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. सध्याची ही वेळ कोणतेही राजकारण करण्याची नसून

लोकांना प्रत्यक्ष मदत करण्याची आहे,’ असे मत सुरेखा पखाले यांनी व्यक्त केले.माण तालुक्यातील टाकेवाडी गावाला शेखर गोरे यांच्या माध्यमातून डिझेलसहित पोकलेन मशिन दिले आहे. तेथील कामाच्या प्रारंभप्रसंगी पखाले या बोलत होत्या.

पखाले पुढे म्हणाल्या, ‘माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सध्या अंतिम टप्यात आली आहे. शेखर गोरे यांनी काम करणाऱ्या गावाला मदत करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनाची कदर करून वॉटर कप स्पर्धा संपेपर्यंत पोकलेन मशीन टाकेवाडीत ठेवणार आहे. या माध्यमातून ग्रामस्थांनीही चांगले काम करावे. कारण या ठिकाणच्या लोकांना उन्हाळ्यात स्थलांतर करावे लागते, ही वेळ पुन्हा येऊ नये यासाठी पाणी अडवणे गरजेचे आहे. उद्या हेच पाणी अडले तर स्थलांतर करावे लागणार नाही. पाणी अडविणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची खरी गरज निर्माण झाली आहे.

अलीकडे अनेकजण आश्वासन देऊन निघून जातात. मात्र, आम्ही प्रत्यक्ष मदत करायचे धोरण ठेवले आहे. आज माण तालुक्यातील अनेक गावांत शेखर गोरे यांच्या माध्यमातून पोकलेन मशीन सुरू आहे. त्यामुळे लोकांना याचा खूप फायदा झाला आहे. गावोगावी जलसंधारणाची कामे होत असून त्याचा फायदा भविष्यात नक्कीच दिसून येणार आहे.

तुम्ही चांगले काम करा. लागेल ती मदत द्यायची भूमिका आम्ही घेऊ . टाकेवाडी गाव हे नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या ठिकाणी चांगली कामे व वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर निश्चितच हे पर्यटनस्थळ होईल, असेही पखाले यावेळी म्हणाल्या.यावेळी वाघोजीराव पोळ, मामुशेठ वीरकर यांनी विचार व्यक्त केले.टाकेवाडी येथील या कार्यक्रमाला मान्यवरांसह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.टाकेवाडी, ता. माण येथे शेखर गोरे यांच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पोकलेन मशीन देण्यात आले आहे. यावेळी सुरेखा पखाले, वाघोजीराव पोळ, मामुशेठ वीरकर, दत्ता घाडगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShekhar Goreशेखर गोरे