महाबळेश्वरात तुरळक पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:14+5:302021-01-08T06:08:14+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वर परिसरात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व थंडी असे वातावरण होते. पावसाचे वातावरण निर्माण झालेले दिसून ...

महाबळेश्वरात तुरळक पावसाची हजेरी
महाबळेश्वर : महाबळेश्वर परिसरात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व थंडी असे वातावरण होते. पावसाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत होते. तरीही सकाळी दहापासून ऊन, तर ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील काही भागात तुरळक अवकाळी पाऊस पडला, तर काही भागांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.
महाबळेश्वरात पर्यटकांची संख्याही तुरळकच होती. सकाळपासून थंडीसह ढगाळ वातावरण असल्यामुळे पर्यटक गरम कपडे खरेदी करत होते. बाजारात फेरफटका मारत असताना शाल, स्वेटर, टोपी घालून फिरत होते. सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास महाबळेश्वर बाजारपेठेत ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पाऊस सुरू झाला. यामध्ये बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आलेल्या पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पर्यटक चहाची टपरी व गरमागरम कणीस खाण्याची मजा घेत होते. अवकाळी पावसाची रिपरिप दोन तास चालूच होती.
०७महाबळेश्वर-रेन
महाबळेश्वरसह परिसरात गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये बाजारपेठेतील व्यवहार सुरू होते. (छाया : अजित जाधव)