तरडगाव येथे पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:17+5:302021-06-05T04:28:17+5:30
पावसाची हजेरी तरडगाव : ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाज वर्तविला जात असताना शुक्रवारी दुपारी तरडगाव (ता. फलटण) परिसरात पावसाच्या हलक्या ...

तरडगाव येथे पावसाची हजेरी
पावसाची हजेरी
तरडगाव : ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाज वर्तविला जात असताना शुक्रवारी दुपारी तरडगाव (ता. फलटण) परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, तर सायंकाळी पाचनंतर पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. दोन दिवसांपूर्वी परिसरात मोठा पाऊस झाला होता. तेव्हापासून रोज पावसाचे वातावरण तयार होत असल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. पाऊस लागून राहिल्यास ही कामे खोळंबली जाऊन पेरणी लांबणीवर पडेल म्हणून शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे.
वाहनधारकांची
कसरत थांबेना
मेढा : सातारा-महाबळेश्वर या मार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी घाटमार्गातील रस्ता पावसामुळे वाहून गेला असून, या मार्गावरील वाहतूक आता पूर्णत: बंद झाली आहे. संबंधित विभागाने रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावून, वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.