खंडाळ्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST2021-05-22T04:36:18+5:302021-05-22T04:36:18+5:30
खंडाळा : खंडाळा परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन गारवा पसरला, तर शेतकऱ्यांचीही ...

खंडाळ्यात पावसाची हजेरी
खंडाळा : खंडाळा परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन गारवा पसरला, तर शेतकऱ्यांचीही धांदल उडाली.
खंडाळा, शिरवळ परिसरात हवेत बदल निर्माण होऊन ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह चार वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतीकामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडाली. विशेषतः भुईमूग पिकाची काढणी सुरू आहे. त्याचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच दुचाकीस्वारांना रस्त्याच्या बाजूलाच आसरा शोधावा लागला.
गेल्या दोन दिवसांत तापमान वाढले होते. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, शुक्रवार दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला.