शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा

By नितीन काळेल | Updated: April 17, 2024 19:28 IST

सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सातारा शहरात तर सलग तिसऱ्या दिवशी पारा ४० अंशावर नोंद झाला. यामुळे ...

सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सातारा शहरात तर सलग तिसऱ्या दिवशी पारा ४० अंशावर नोंद झाला. यामुळे नागरिकांना उन्हाळा असह्य ठरु लागला आहे. दरम्यानच, आज बुधवारी दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. तर त्यानंतर हिवाळ्यातही थंडीची तीव्रता कमी जाणवली. मात्र, उन्हाळा असह्य ठरु लागला आहे. कारण, दरवर्षी मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत थंडी जाणवते. पण, यावर्षी मार्च उजाडताच उन्हाची तीव्रता जाणवू लागली. हळूहळू पारा वाढत गेला. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर सातारा शहराचे कमाल तापमान ३९ अंशावर पोहोचले होते. त्याचवेळी पूर्व दुष्काळी भागातील माण, फलटण या तालुक्यात पाऱ्याने ४० अंशाचा टप्पा पार केलेला. पण, याच दरम्यान ढगाळ वातावरण झाल्याने पारा खाली आला होता. मात्र, मागील आठ दिवसांत पारा बहुतांशीवेळा ३९ अंशाच्यावर राहिला आहे. मागील तीन दिवसांत तर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती आहे.सातारा शहरात सोमवारपासून पारा ४० अंशावर आहे. मंगळवारी ४०.३ अंश तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. तर बुधवारी ४०.१ अंश तापमान राहिले. सतत कमाल तापमान ४० अंशादरम्यान राहत असल्याने दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत रस्त्यावर तुरळक वाहने दिसतात. तसेच बाजारपेठेतही गर्दी जाणवत नाही. माण, खटाव, फलटण तालुक्यातील पाराही वाढला आहे. ४१ अंशावर तापमान जात असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, सातारा शहरवासियांना उष्णतेमुळे घराबाहेर पडणे अवघड झाले असलेतरी बुधवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील काही भागातच पावसाची हजेरी होती. पण, याने उकाड्यापासून काहीसा दिलासा दिलेला आहे.

सातारा शहरातील कमाल तापमान असे :दि. १ एप्रिल ३९, २ एप्रिल ३९.२, ३ एप्रिल ३९.२, ४ एप्रिल ३९.८, ५ एप्रिल ३९.७, दि. ६ एप्रिल ३९.७, ७ एप्रिल ३८.८, ८ एप्रिल ३८.७, ९ एप्रिल ३९.२, दि. १० एप्रिल ३९.१, ११ एप्रिल ३९.२, १२ एप्रिल ३६.७, १३ एप्रिल ३७.९, १४ एप्रिल ३९.६, दि. १५ एप्रिल ४०.१, १६ एप्रिल ४०.३ आणि दि. १७ एप्रिल ४०.१

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसTemperatureतापमान