गुढीपाडव्यासाठी शाहूनगरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:28 IST2019-04-05T22:28:01+5:302019-04-05T22:28:06+5:30
सातारा : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून सातारनगरी सज्ज झाली आहे. गुढी उभी करण्यासाठी ...

गुढीपाडव्यासाठी शाहूनगरी सज्ज
सातारा : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून सातारनगरी सज्ज झाली आहे. गुढी उभी करण्यासाठी आवश्यक असणारे बांबू, साखरगाठी, कडुनिंबाची पाने खरेदी करण्यासाठी संध्याकाळी बाजारपेठेत गर्दी होती.
सूर्योदयाला घरासमोर उंच जागेवर गुढी उभारून तिची पूजा करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री सातारकरांनी जमवून ठेवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर गाठींच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. साखर आणि गॅस वाढल्यामुळे ही वाढ करणं अनिवार्य असल्याचं व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरात नवीन वस्तू, सुवर्ण खरेदी करण्याकडे सातारकरांचा कल असतो. ही मुहूर्ताची खरेदी ग्राहकांनी आपल्याकडे करावी, यासाठी बाजारपेठेत अनेक आॅफर्स दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकांनी दुकानांवर विद्युतरोषणाईही केली आहे.
हातगाड्यांवरही साखरगाठी!
साताऱ्याच्या बाजारपेठेत यंदा हातगाड्यांवर साखरगाठी उपलब्ध असल्याचं चित्र पाहायला मिळालं. या साखरगाठी तयार करणारे उत्पादक आणि उत्पादनाचं ठिकाण हे दोन्ही ज्ञात नसल्यामुळे ही साखरगाठी खाणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. साताºयात ठिकठिकाणी कामे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमणावर त्याची धूळ या साखरगाठीवर बसत असल्याचे निरीक्षणही काहींनी नोंदविले.