शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

रथोत्सवासाठी औंधनगरी सज्ज

By admin | Updated: January 6, 2015 00:48 IST

मान्यवरांची उपस्थिती : विविध भागातून भाविक दाखल

यमाईदेवीच्या वार्षिक रथोत्सवास आज (मंगळवार) दुपारपासून प्रारंभ होत आहे. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रथोत्सव होणार आहे. या वार्षिक रथोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, महिला बालकल्याण सभापती कल्पना मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, खटाव पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, तहसीलदार विवेक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.श्री यमाईचे मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री यमाईदेवीची रथात स्थापना व भव्य मिरवणूक औंधनगरीत निघणार आहे. यात्रा कालावधीत क्रीडा स्पर्धाऔंधच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्वान स्पर्धा, क्रिकेट सामने, पाककला, शरीरसौष्ठव स्पर्धा, गिर्यारोहण, पोहणे तसेच कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.ऐतिहासिक ठेवा : भवानी चित्रसंग्रहालयऔंध येथील भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे इतिहास व विविध कलांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठा खजिना आहे. या ठिकाणी राज्याच्या विविध भागांतील छायाचित्रकार तसेच हस्तकला, कौशल्यात पारंगत असणारे कलाकार वेळोवेळी भेट देत असतात. याठिकाणी ठेवलेले विविध शिल्प उत्कृष्ठ कलेचा नमुना आहे. येथील ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी संग्रहायलयातील व्यवस्थापक जातीने लक्ष देऊन काळजी घेत असतात. याठिकाणी राज्याच्या विविध भागांतील शालेय सहली येत असतात.अशी आहेत दालनेस्वागत कक्ष : संग्रहालयाच्या प्रवेशद्वारासमोर श्रीमंत बाळासाहेब महाराज यांचे तैलचित्र लावलेले असून, चित्राच्या पाठीमागे संग्रहालयात कोणकोणते विभाग आहेत, याचा नकाशा लावलेला आहे. छायाचित्र विभाग : स्वागत कक्षातून आत जाताच डावीकडे श्रीमंत बाळासाहेब महाराज यांच्या संबंधित दुर्मीळ फोटोंचे छायाचित्र लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या घराण्याची वंशावळ, बाळासाहेब महाराज यांची जन्मकुंडली इतिहासप्रेमींना पाहावयास मिळते. याच भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर पत्र, श्रीमंत बाळासाहेब महाराजांचे वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांना लिहिलेले पत्र व इतर हस्ताक्षरांचे नमुने पाहावयास मिळतात.४पंतप्रतिनिधी दालन : येथे पंतप्रतिनिधी घराण्याती व्यक्तींची पेंटिंग प्रदर्शित केली आहेत. तसेच औंध पंतप्रतिनिधी पद भूषविलेल्यांची माहिती दिलेली आहे.४कोट्याळकर चित्रदालन : येथे बाळासाहेब महराजांच्या दरबारी असलेले चित्रकार विराप्पा कोट्याळकर या कलावंताचे पौराणिक चित्रांचे दालन आहे.