शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच ‘हा’ शपथविधी : पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 12:09 IST

राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती; मोदी सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील

कऱ्हाड (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या लोकसभा महत्त्वाची असल्याने सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. महाविकास आघाडीतून जे गेले ते गेले. मात्र, महाविकास आघाडीची भीती आजही भाजपला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजे अजित पवारांचा शपथविधी असल्याचे ते म्हणाले.कऱ्हाड येथे रविवारी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला अनेक दिवसांपासून जी शंका होती, ती घटना अखेर आज घडलीच. याचा पहिला अंक आज झाला असून, पुढचे अंक येत्या दोन दिवसांत आपल्याला पाहायला मिळतील. राष्ट्रवादीतील आमदारांवर ईडीची छत्रछाया आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह शिंदे-भाजप गटात गेलेल्यांना चांगली झोप लागावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.शिवसेनेत झालेली फूट, या खटल्याचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. या अपात्रतेचा निकाल ९० दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार आमदार अपात्र होतील, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे. जर अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत घ्यावयाचा आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोळा आमदार अपात्र होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदही रिक्त होऊ शकते. अपात्र आमदारांवरील कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच आजचा राजकीय भूकंप आहे.सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांना मला एवढेच सांगायचं आहे की, जनतेला गृहीत धरू नका. जनता मूर्ख नाही. कर्नाटकच्या निवडणुकीत काय झाले, हे सर्वांसमोर आहे. महाविकास आघाडी एकत्र असल्यावर भाजपचे काही चालत नाही, हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच राज्यात दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोणीतरी गेले म्हणून महाविकास आघाडी फुटली, असे अजिबात म्हणता येणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच लढणार आहोत. जे गेले ते गेले, आम्ही मात्र विचाराने एकत्र असून जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी एकजुटीने निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.घोटाळ्याच्या आरोपांनंतर राष्ट्रवादीत फूट!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवत ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत राष्ट्रवादीतील मोठा गट राष्ट्रवादी सोडून भाजपात सामील झाला. हा मोठा विरोधाभास म्हणायला हवा. सध्या राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती पाहायला मिळत आहे.

तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल!राष्ट्रवादीमधील ५३ आमदारांपैकी दोन तृतीयांश गट बाहेर पडला पाहिजे तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. यासाठी अजित पवार यांना ३६ आमदारांची गरज आहे. पुढच्या काही दिवसांत ३६ पेक्षा जास्त आमदार त्यांच्याजवळ आहेत की नाही, ते पाहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या राजकारणाची अधोगती झाली आहे. पैसा व सत्तेचे राजकारण सध्या भाजपने सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना जनता माफ करणार नाही, हे कर्नाटक निकालावरून समजून येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष