शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्रतापसिंह फार्मला अर्ध्या कोटींचे कंपाऊंड!, लवकरच काम सुरू : जिल्हा परिषदेचे पाऊल; लोकमतच्या वृत्ताची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:04 IST

सातारा जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पहिल्या टप्प्यात या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५४ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली.

ठळक मुद्देलवकरच काम सुरू, सातारा जिल्हा परिषदेचे पाऊललोकमतच्या वृत्ताची दखल, पहिल्या टप्प्यात संपूर्ण जागेला कंपाऊंड

सातारा : जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे.

लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पहिल्या टप्प्यात या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५४ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.शेतकऱ्यांना शेतातील विविध प्रयोग करण्यासाठी राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत येथे तळीरामांचा वावर वाढला आहे. दिवसाढवळ्या या फार्ममध्ये चकण्यासह तळीराम ठाण मांडून बसत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते.

येथील राधिका रोड मार्गावर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या आणि काही एकरांत विस्तारलेल्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीतील विविध प्रयोग केले जातात.

सक्रियपणे येथे गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, शेळीपालन प्रकल्प आदी प्रकल्प येथे सुरू आहेत. मात्र, पूर्वीइतका सामान्यांचा राबता या फार्मकडे दिसत नाही.प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शेतीशी निगडित विविध प्रयोग केले जातात. येथे सुरू असलेला गांडूळ खत प्रकल्प पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन मुलं येतात. काही शाळा तर येथे शैक्षणिक सहलही काढतात.

नेमकं या सहली येथे आल्यानंतर येथे आलेल्या मुला-मुलींना हे प्रकार खूपच भयावह वाटतात. शासकीय जागेचा होणारा गैरवापर थांबविण्याची मागणी होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते.त्याचे कारणही तसेच आहे. दुपारी एकनंतर या परिसरात मद्यपींचा अड्डा जमतो. तीन-चारजणांचे टोळके गाड्यांवरून बाटल्या घेऊनच फार्ममध्ये एन्ट्री करते. त्यानंतर झाडाच्या सावलीखाली त्यांचा डाव रंगतो.

कागदातून बांधून आणलेला चकणा खात-खात, एक-एक घोट थेट बाटलीनेच मद्यप्राशन सुरू असते. मोठ्या आवाजातील गप्पा आणि सोबतीला उडत्या चालीची गाणी यामुळे त्यांना बारमध्येच बसल्याचा जणू आनंद मिळतो. शेतीफार्ममध्ये काही कामानिमित्ताने येणाऱ्यांना हा नजारा आता नित्याचाच बनला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद