शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: प्रतापगड कारखान्याची पहिली उचल ठरली; २८५० मिळणार

By नितीन काळेल | Updated: November 30, 2023 18:25 IST

शिवेंद्रसिंहराजेंकडून दर जाहीर : सर्वांच्या सहकार्यातून हंगाम यशस्वी करणार 

सातारा : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना गळीतास आलेल्या उसाला पहिली उचल प्रति टन २ हजार ८५० रुपये देणार असल्याचे अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समुहाचे मार्गदर्शक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले. तसेच सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जावळी तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला प्रतापगड कारखाना गेल्या ५ वर्षांपासून बंद अवस्थेत होता. ही सहकारी संस्था पुन्हा उभी रहावी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेतला. अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योगाची स्थापना करून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने प्रतापगड कारखाना सुरू केला. प्रतापगड कारखान्याचा हा पहिलाच गळीत हंगाम सुरू आहे. हा हंगाम यशस्वी होण्यासाठी आणि प्रतापगड कारखाना खऱ्या अर्थाने उभा राहावा यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सौरभ शिंदे आणि संचालक मंडळाकडून नियोजनबद्ध आणि काटकसरीचे धोरण राबवून कारखाना चालवला जात आहे. हा पहिलाच हंगाम असून कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही सध्याच्या आर्थिक नियोजनानुसार प्रतापगड कारखाना गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन २ हजार ८५० रुपये पहिली उचल देणार आहे.दरम्यान, कारखाना सर्वांच्या सहकार्याने जोमाने सुरू आहे. रिकव्हरीनुसार पुढील आर्थिक नियोजन केले जाईल. तसेच हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने