लेकाचं कौतुक ऐकून ‘त्या’ आईनं सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:47 PM2019-02-19T22:47:41+5:302019-02-19T22:47:48+5:30

सातारा : शिक्षण मर्यादित, भांडवल-साधनसामग्रीची वानवा हे खरं असलं तरी तो स्वत:ला सिद्ध करून दाखवेल, ही तिची वेडी माया ...

Pran, who left the mother, said, listening to Lacca's appreciation | लेकाचं कौतुक ऐकून ‘त्या’ आईनं सोडला प्राण

लेकाचं कौतुक ऐकून ‘त्या’ आईनं सोडला प्राण

Next

सातारा : शिक्षण मर्यादित, भांडवल-साधनसामग्रीची वानवा हे खरं असलं तरी तो स्वत:ला सिद्ध करून दाखवेल, ही तिची वेडी माया नव्हे तर खात्री. तर त्यानेही जगासमोर स्वत:ला सिद्ध केलं. याबाबत वर्तमानपत्रात आलेली बातमी तिला मुलाने ऐकवली. स्वत:च्या लेकाची ही प्रसिद्धी ऐकल्यानंतर या माऊलीने जगाचा निरोप घेतला. लक्ष्मी भिकू भंडारे (वय ६३) असे या मातेचं नाव.
याबाबत माहिती अशी की, ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात गजवडी (ता. सातारा) येथील सचिन भंडारे या तरुणाची बातमी प्रसिद्ध केली होती. या तरुणाचीच लक्ष्मी भंडारे या आई होत.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सचिन भंडारे याने ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बँकेने काही कारणाने त्याला कर्ज देण्याचे नाकारले. ना उमेद न होता या प्रसंगालाच संधी मानून त्याने स्वत: ट्रॅक्टर तयार करण्याचा निर्णय घेतला आणि काही महिन्यांत त्याने दारात स्वत:चा ट्रॅक्टर उभा केला. तेही जवळपास निम्म्या किमतीत.
दरम्यान, सचिन ट्रॅक्टर तयार करतोय, हे समजल्यानंतर सुरुवातीला त्याला चेष्टेत काढण्याचा प्रयत्न लोकांनी केला. मात्र, त्याची आई लक्ष्मी यांना आपल्या मुलाच्या कार्यकुशलतेवर विश्वास होता. त्यांनी त्याला ना उमेद न करता प्रोत्साहन दिले.
सचिनच्या या यशस्वी प्रयत्नाची कहाणी जाणून घेऊन ती लोकांपुढे मांडण्यासाठी ‘लोकमत’ची टीम त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी लक्ष्मी भंडारे यांच्या चेहऱ्यावर लेकाच्या यशाचे कौतुक लपून राहू शकले नाही.
परिस्थितीमुळे मुलगा पुढे शिकू शकला नसला तरी त्याने समाजाच्या उपयोगाचे काहीतरी करून दाखवले. हे त्यांच्या चेहºयावरून दिसून येत होते. हे त्याचे कार्यकौतुक वर्तमानपत्रात छापून आलेले पाहण्याची त्यांना उत्सुकता होती. मात्र शनिवारी रात्री लक्ष्मी भंडारे यांना प्रकृती अस्वास्थामुळे साताºयातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे त्या शुद्धीवरही आल्या. शुद्धीवर येताच त्यांनी पेपरात सचिनची बातमी आली का? असं विचारलं.
एवढ्या भल्या पहाटे पेपर कोठे मिळायचा, म्हणून सचिनने मोबाईलवर आॅनलाईन ‘लोकमत’ पेपर डाऊनलोड करून घेतला. मोबाईलवरच त्याने स्वत: तयार केलेल्या ट्रॅक्टरची बातमी आईला वाचून दाखवली. बातमी ऐकल्यानंतर आपण टाकलेला विश्वास लेकाने सार्थ करून दखवला, या जाणिवेतून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यानंतर काही तासांत त्या माऊलीने समाधानाने इहलोकाचा निरोप घेतला. यामुळे कुटुंबावर दु:खाची कुºहाड कोसळली.

माउली कायम वर्कशॉपमध्येच असायची
ट्रॅक्टर निर्मितीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पैसे देण्याबरोबरच त्याला मदत करण्यासाठी ही माऊली कायम त्याच्या वर्कशॉपमध्ये असायची. त्यामुळे काम करण्यात प्रोत्साहन मिळायचे. आईने दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सचिनने अविरत परिश्रम घेतले. त्याचे फलित म्हणजे आज त्याचा स्वत:चा ट्रॅक्टर आहे, अशा भावना सचिन भंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

Web Title: Pran, who left the mother, said, listening to Lacca's appreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.