कासार विकास समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश तवटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:18+5:302021-08-29T04:37:18+5:30
कऱ्हाड : सातारा येथे पश्चिम महाराष्ट्र कासार समाजाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कऱ्हाड येथील प्रकाश बाळकृष्ण तवटे ...

कासार विकास समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश तवटे
कऱ्हाड : सातारा येथे पश्चिम महाराष्ट्र कासार समाजाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कऱ्हाड येथील प्रकाश बाळकृष्ण तवटे यांची पश्चिम महाराष्ट्र कासार समाज विकास समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील प्रसिद्ध उद्योजक, मध्यवर्ती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समितीचे सदस्य बाळासाहेब होरणे होते.
प्रकाश बाळकृष्ण तवटे यांची पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी देवेंद्र भुजबळ, पुणे मनपाचे विद्यमान नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, रमेश जुन्नरकर, राजेंद्र अचलारे, चंद्रकांत शेटे, स्मिता धारूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पश्चिम महाराष्ट्र कासार समाज आणि त्याचे संघटन, संवाद व विकास या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. अखिल भारतीय मध्यवर्ती युवक मंडळाचे युवाध्यक्ष प्रकाश तवटे, उपाध्यक्ष अनिल अष्टेकर, सौरभ कोळपकर, महिला अध्यक्षा स्मिता धारूरकर आदींनी ‘पश्चिम महाराष्ट्र विकास समिती स्थापन आणि त्याचा उद्देश’ या विषयावर मार्गदर्शन केले.
राजेंद्र अचलारे, आशाताई कुंदप, डॉ. सुनील अंदुरे, हेमंत कासार, राजाराम कासार, विकास सातपुते, डॉ. संतोष मोहिरे, रमाकांत कानडे यांची भाषणे झाली. आनंद डांगरे, रमाकांत कानडे, दिलीप रासने, श्याम सासवडे, रवींद्र कुंदप, भैया झुटिंग, सचिन खुटाळे, विजय पालकर, अशोक कुंदप, महेश कोकीळ, मदन कोकीळ, श्रीनिवास तवटे, अमित पालकर, अनिता येवारे, अश्विनी पालकर, माधवी कोकीळ, सुलभा तवटे तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर व पुणे येथील समाजबांधव उपस्थित होते.
आयकार्ड
फोटो
प्रकाश तवटे
--------------------