विनयभंगप्रकरणी चौघांवर ‘पोक्सो’चा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST2021-02-14T04:37:05+5:302021-02-14T04:37:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महिला, तिची मुलगी आणि दिराला सातारा तालुक्यातील जैतापूर गावच्या शिवारात मारहाण करुन मुलीचा ...

Poxo offenses against four in molestation case | विनयभंगप्रकरणी चौघांवर ‘पोक्सो’चा गुन्हा

विनयभंगप्रकरणी चौघांवर ‘पोक्सो’चा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : महिला, तिची मुलगी आणि दिराला सातारा तालुक्यातील जैतापूर गावच्या शिवारात मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला ही मजुरी करते. शुक्रवार, १२ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती स्वत:, तिची मुलगी आणि दीर असे तिघेजण गावच्या हद्दीत चिंचा तोडण्यासाठी गेले होते. ते चिंचा झाडत असतानाच किशोर रमेश पवार, मीनाक्षी किशोर पवार, आश्रग रंज्या पवार, अधीक्षक पितांबर शिंदे या चौघांनी फिर्यादी महिलेला लाथाबुक्क्याने आणि काठीने मारहाण करुन शिवीगाळ करत दमदाटी केली. दिरालाही हात आणि लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले. यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलीला दगडाने मारहाण करुन तिचे कपडे फाडून विनयभंग केला.

या घटनेनंतर फिर्यादी महिलेने शुक्रवारी रात्री पावणेसात वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात संबंधित चौघांविरोधात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव करत आहेत.

Web Title: Poxo offenses against four in molestation case