शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फलटण तालुक्यातील सासकल येथील वीज उपकेंद्र बंद पाडले, चौघावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:48 IST

फलटण : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र सासकल याठिकाणी उपकेंद्रातील नियंत्रण कक्षात घुसून वीज उपकेंद्र बंद पाडत, वरिष्ठ अधिकाऱ्याला ...

फलटण : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र सासकल याठिकाणी उपकेंद्रातील नियंत्रण कक्षात घुसून वीज उपकेंद्र बंद पाडत, वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याच्या धमकी दिली. तसेच वीज वितरण कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून सासकल येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सासकल येथील वीज उपकेंद्रामध्ये सोमवारी (दि. ११) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कनिष्ठ यंत्र चालक संतोष लक्ष्मण क्षीरसागर व त्यांच्यासह कर्मचारी ज्ञानेश्वर सुदामराव डाकोरे हे काम करत होते. त्यांना फलटण १३२ केव्ही उपकेंद्रातून सासकल वीज उपकेंद्र नियंत्रण कक्ष मोबाइलवर कृषी वीज वाहिनी फोर्स लोड शेडिंग करण्याबाबत मेसेज आला. क्षीरसागर यांनी वडले व दुधेभावी कृषी वीज वाहिन्यांचे भारनियमन केले.दरम्यान, सासकल गावातील बाबुराव उर्फ निलेश मानसिंग मुळीक, राजेंद्र मुगुटराव धुमाळ, गणेश ज्ञानदेव मुळीक, अमित विष्णू मुळीक हे तिथे आले. क्षीरसागर व सहकारी कर्मचाऱ्यांना ‘आमची स्कूल कृषी वीज वाहिनी सुरू करा,’ असे म्हणत त्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणला. त्याचबरोबर सासकल वीज उपकेंद्र बंद पाडण्यास भाग पाडले.यामधील अमित मुळीक याने नियंत्रण पॅनल बंद केल्याने तीन तास वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे तालुक्यातील १७ गावांचा वीजपुरवठा बंद राहिल्याने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत या कारणावरून चौघांविरूध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची संतोष लक्ष्मण क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी