साताऱ्यात विजेचा लपंडाव सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:04 IST2021-05-05T05:04:49+5:302021-05-05T05:04:49+5:30
सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसाबरोबरच रात्रीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांतून नाराजी ...

साताऱ्यात विजेचा लपंडाव सुरू
सातारा : सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसाबरोबरच रात्रीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी सतारकरातून होत आहे.
सातारा शहराचा परिसर मोठा आहे. हजारो व्यावसायिक व नागरिक शहरात आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे. दिवसाबरोबरच रात्रीही वीज पुरवठा खंडित होत आहे. गेल्या दोन दिवसात तर अनेक वेळा वीज पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मंगळवारीही वीज पुरवठा खंडित झाला होता.
.........................................................................