साताऱ्यातील वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:11+5:302021-02-05T09:19:11+5:30
सातारा : सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी अनेक तास बंद झाला होता. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विजेचे ...

साताऱ्यातील वीजपुरवठा खंडित
सातारा : सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी अनेक तास बंद झाला होता. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विजेचे काही काम असल्यास शहरातील वीजपुरवठा मंगळवारी खंडित करण्यात करण्यात येतो. या मंगळवारी तर सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेक भागात वीज नव्हती. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
.......................................................
भाजीमंडईच्या बाजूला कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील अनेक भाजी मंडईच्या बाजूला कचरा पडलेला असतो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. शहरातील अनेक भागात मंडई आहेत. काही ठिकाणी बरेचजण भाजीपाला टाकून जातात. तसेच कचरा पडलेला असतो. हा कचरा वेळेत उचलला नाही, तर परिसरात दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देण्याची खरी आवश्यकता आहे.
...........................................................
राजवाडा बसस्थानकातच वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात रात्रीच्या सुमारास वाहने लावली जातात. त्यामुळे बसस्थानक आहे की पार्किंगस्थळ असा प्रश्न निर्माण झाला आहे. साताऱ्यातील अनेक नागरिक सायंकाळी खरेदीसाठी येतात. यावेळी ते राजवाडा बसस्थानकातच गाड्या लावतात. तसेच या ठिकाणी कचराही निर्माण होतो. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
...........................................................