वीज अधिकाऱ्यांना काळे फासणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:35+5:302021-03-25T04:37:35+5:30

याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले की, महावितरणकडून वीज वसुली जोरात सुरू आहे. बळिराजा शेतकरी संघटनेच्यावतीने लॉकडाऊन काळात ...

Power officials will be blackmailed! | वीज अधिकाऱ्यांना काळे फासणार !

वीज अधिकाऱ्यांना काळे फासणार !

याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले की, महावितरणकडून वीज वसुली जोरात सुरू आहे. बळिराजा शेतकरी संघटनेच्यावतीने लॉकडाऊन काळात वीज बिल माफी आणि नंतर वसुली असे दोन वेगवेगळे विधान करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निषेध करण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानुसार महावितरणचे अधिकारी घरगुती व शेती पंपाच्या वीज बिल वसूल करीत आहेत. त्यासाठी कनेक्शन तोडले जात आहे. मात्र, हे करताना त्यांच्याकडून कायदा व व्यवहार यांची सांगड घातली जात नाही. अनेकांना वेठीस धरून वसुली केली जात आहे. दमदाटी केली जात आहे. कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात आहे. अगोदरच शेतकरी व सामान्य जनता आर्थिक संकटात असताना सुरू असलेली ही वसुली त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे वीज कंपनीने वसुली करताना कायदा आणि व्यवहार याची सांगड घालावी, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Power officials will be blackmailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.