नराचा नारायण बनवण्याची ताकद फक्त ग्रंथालयातच : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:28+5:302021-08-15T04:39:28+5:30

मलकापूर : ‘आज इंटरनेटच्या युगात ज्ञानाबरोबर प्रत्येकाला जीवन शिक्षण मिळाले पाहिजे. ज्ञानच शाश्वत मूल्ये रुजविण्याचे काम करते हेच प्राचीन ...

The power to make a man Narayan only in the library: Patil | नराचा नारायण बनवण्याची ताकद फक्त ग्रंथालयातच : पाटील

नराचा नारायण बनवण्याची ताकद फक्त ग्रंथालयातच : पाटील

मलकापूर : ‘आज इंटरनेटच्या युगात ज्ञानाबरोबर प्रत्येकाला जीवन शिक्षण मिळाले पाहिजे. ज्ञानच शाश्वत मूल्ये रुजविण्याचे काम करते हेच प्राचीन काळापासून ऋषीमुनींनीही सांगितले आहे. वाचाल तर वाचाल म्हणीप्रमाणे प्रत्येकाने वाचले पाहिजे, त्यासाठी ग्रंथालयांची गरज आहे. ग्रंथालयातील ही पुस्तकेच तुम्हाला नराचा नारायण करतील,’ असे प्रतिपादन प्रा. एन. ए. पाटील यांनी केले.

येथील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयात आयोजित विविध कार्यक्रमांत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतीमित्र अशोकराव थोरात होते. यावेळी अरुणादेवी पाटील, नगरसेविका निर्मला काशीद, डॉ. स्वाती थोरात, डॉ. सारिका गावडे, वसंतराव चव्हाण, नगरसेवक अजित थोरात, आबासाहेब सोळवंडे, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, टी. एच. ऐवळे, प्राचार्य एस. वाय. गाडे, सुलोचना भिसे, सचिन शिंदे, पवन पाटील, ज्योती शिंदे, सुधाकर शिंदे, डी. पी. कांबळे, ग्रंथपाल स्वाती घाटगे, बापूसो चव्हाण, सर्व संचालक, वाचक उपस्थित होते.

अशोकराव थोरात म्हणाले, ‘प्रत्येक गावचे स्वतंत्र समृद्ध असे ग्रंथालय असले पाहिजे. तसेच घराघरांत वैयक्तिक ग्रंथालये निर्मिती हा विचारही समाजात रुजला पाहिजे. लोकांमध्ये ग्रंथप्रेम निर्माण केले तर ग्रंथवाचनाने जीवनात सुख समाधान मिळते. व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण पुस्तकांमधून होते. याचसाठी वाचनसंस्कृती जपली पाहिजे. जमिनीवर वाचलेल्या पुस्तकात आभाळाकडे नेण्याची क्षमता असते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीला पाटील यांनी केले. एस. डी. खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. कुंभार यांनी आभार मानले.

१४मलकापूर

मलकापुरातील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयात आयोजित विविध कार्यक्रमात एन. ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

140821\img-20210814-wa0008.jpg

फोटो कॕप्शन

मलकापूरातील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयात आयोजित विविध कार्यक्रमात वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड चे प्रा. एन.ए.पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The power to make a man Narayan only in the library: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.