ग्रंथालयात नवीन पिढी घडविण्याचे सामर्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:15+5:302021-09-07T04:46:15+5:30
औंध : ‘प्रत्येक गावात ग्रंथालय असणे ही काळाची गरज आहे. ग्रंथालयात विद्यार्थी येऊन अभ्यास करतात, ही त्यांची उत्तम सवय ...

ग्रंथालयात नवीन पिढी घडविण्याचे सामर्थ्य
औंध : ‘प्रत्येक गावात ग्रंथालय असणे ही काळाची गरज आहे. ग्रंथालयात विद्यार्थी येऊन अभ्यास करतात, ही त्यांची उत्तम सवय आहे. ग्रंथालयात नवीन पिढी घडविण्याचे सामर्थ्य आहे,’ असे मत गोपूजच्या सरपंच सरिता घार्गे यांनी व्यक्त केले.
गोपूज येथील यशवंत ग्रामीण ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी उपसरपंच संतोष कमाने, वनाधिकारी भाग्यश्री जाधव, चंद्रकांत घार्गे, सुहेल कणसे, रणजित चव्हाण, रामदास घार्गे, कृष्णत जाधव, उमेश घार्गे, सचिन घार्गे, महेश घार्गे, तोसिफ मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाग्यश्री जाधव म्हणाल्या, ‘कोरोना काळात शाळा बंद आहेत. मात्र, असे उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळणार आहे. संतोष कमाने म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना एक चांगली सवय लागणार आहे. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.
दरम्यान, लहान गटात झालेल्या स्पर्धेत ईश्वरी हणमंत घार्गे प्रथम, जुनैद रशिद शेख द्वितीय, वेदिका सचिन घार्गे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
मध्यम गटात रेहान रशिद शेख प्रथम,
आयुष तुषार खराडे, द्वितीय, सेजल संतोष पवार, तृतीय, मयुरेश हणमंत खराडे, चतुर्थ, तर पाचवा हर्षदा सोमनाथ घाडगे हिने पटकावला. मोठ्या गटात वैष्णवी हणमंत घार्गे, प्रथम, साक्षी सचिन गुरव, द्वितीय, तर श्रावणी सत्यवान खराडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तोसिफ मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. रणजित चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो: ०६औंध
गोपूज येथील यशवंत ग्रामीण ग्रंथालयाचा वर्धापन दिन व शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांसह सरपंच, उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)