शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

खड्ड्यांची जबाबदारी वर्षभर ठेकेदारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:06 PM

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात ...

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. रस्ते करण्याची प्रचलित पद्धत कायम आहे. अनेकदा पाऊस पडला की रस्ता खराब होतो, हे नेहमीचे गणित आहे. यंदा तर पावसाने हद्दच केल्याने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती होती. रस्त्यांची चाळण झाल्याने सर्वच माध्यमांतून सरकारवर टीका होऊ लागली.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खराब झालेल्या ९२८ किलोमीटर अंतरातील राज्यमार्ग व १ हजार ५०० किलो मीटर अंतरातील प्रमुख जिल्हा मार्गांचे काम बांधकाम विभागाने टार्गेट ठेवले. मध्यंतरीच्या काळात राज्याच्या धर्तीवर एकच डीएसआरचा निर्णय आणि त्यानंतर अंमलात आलेली जीएसटी करप्रणाली याला विरोध करत बांधकाम ठेकेदारांनी कामांवर बहिष्कार टाकला होता. कुठल्याही शासकीय कामाचे टेंडर भरायचे नाही, असे धोरण ठरवून ठेकेदारांनी काम बंद ठेवले, याचा परिणाम म्हणून पावसाळ्याआधी टेंडर प्रक्रिया झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावरील खड्डेही मुजविले गेले नाहीत.नोव्हेंबर महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मंत्रालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम विभागातील वॉररूमही तयार करण्यात आली. दीड महिन्यात तब्बल २ हजार ४२८ किलोमीटर अंतरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवायचे काम सुरू करण्यात आले.पूर्ण झालेल्या कामाचे रिपोर्ट रोजच्या रोज बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सायंकाळी पाच वाजता मिळत होते. ते मंत्रालयात पाठविले जाऊ लागले आहेत. ठेकेदारांचे ८५ युनिट जिल्हाभर कार्यरत आहेत. एका कामावर २० कामगार असे एकूण १ हजार ७०० कामगार राबत आहेत.हे काम वेगाने करायचे असले तरी संबंधित ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराला वेगळे पैसे मिळणार नाहीत.दिलेल्या रकमेतच दुरुस्तीचेकाम करावे लागणार आहे. त्यांनातशी अटही घातली गेली असल्याने सुदैवाने रस्त्यांवर लगेच खड्डेपडतील, ही शक्यता सध्या तरी दिसत नाही.मोबाईल युनिट वर्षभर राहणार सज्जरस्त्यावर खड्डा पडल्यानंतर लोकांनी आवाज उठविण्याची वाट पाहायची गरज नाही. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांच्या ठिकाणी मोबाईल युनिट सर्व्हे करण्यासाठी पाठवायचे आहे. भरलेला खड्डा पुन्हा खराब झाला असल्यास तो भरण्याचे काम तत्काळ हाती घ्यायचे आहे.ओखीच्या संकटामुळेमोठा गतिरोधकदोन दिवसांपासून ओखी वादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. पाऊस आणि डांबराचे वैर असते, साहजिकच पावसामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा गतिरोधक उभा राहिला आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग