शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

अदालतवाड्यातून पिस्टल चोरणारा अल्पवयीन ताब्यात

By admin | Updated: February 3, 2015 23:53 IST

एलसीबीची कारवाई : तीन जिवंत काडतुसेही हस्तगत

सातारा : अदालतवाड्यातून चोरीला गेलेली पिस्टल शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली.याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील अदालतवाड्यातून शिवाजीराजे भोसले यांची अडीच लाख रुपयांची २२ बोअरची ‘मेड इन स्पेन’ची पिस्टल चोरीला गेली होती. या अनुषंगाने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही पिस्टल माची पेठ येथीलच एका अल्पवयीन मुलाने चोरून नेल्याची माहितीस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्यानंतर त्यांने ही पिस्टल त्याच्या घरामध्ये असणाऱ्या लोखंडी बॅरेलमध्ये ठेवल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्टल आणि तीन जीवंत काडतूसे हस्तगत केली आहेत. संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर, शामराव मदने, सहायक पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, हवालदार संजय पवार, विजय शिर्के, पोलीस नाईक कांतीलाल नवघणे, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन भोसले, चालक संजय जाधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)‘स्टेटस सिम्बॉल’साठीस्थानिक गुन्हे शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार, अदालत वाड्यातील पिस्टल चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा शालेय विद्यार्थी आहे. तो एका खासगी क्लासलाही जातो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो संबंधित क्लासचालकाची दुचाकी घेऊन क्लासचालकाचे काम करण्यासाठी बाहेर गेला होता. पोलिसांनी त्याला विचारणा केल्यानंतर चोरीची कबुली दिली. मात्र, आपण ‘सारे काही स्टेटस सिम्बॉल’साठी केले असल्याचेही त्याने मान्य केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.