शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:09 IST

घरात चार्जिंगला लावलेले मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे तब्बल १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यातचोरीचे १४ मोबाईल जप्त : शाहूपुरी पोलिसांची कारवाई

सातारा : घरात चार्जिंगला लावलेले मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे तब्बल १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.राजवाडा परिसरात एक युवक चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी बाराच्या सुमारास तेथे जाऊन संशयिला ताब्यात घेतले. त्यावेळी संबंधित संशयित अल्पवयीन असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आत्तापर्यंत चोरलेले १४ मोबाईल पोलिसांकडे दिले. या अल्पवयीन मुलाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घरात चार्जिंगला लावलेले कोणाचे मोबाईल चोरीस गेले असतील तर त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, कॉन्स्टेबल बाजीराव घाडगे, हिम्मत दबडे-पाटील, हसन तडवी, अशोक जाधव, लैलेश फडतरे, अमीत माने, सचिन माने, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस