शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

फलटणमधील मोठ्या ग्रामपंचायती महिलांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST

फलटण : तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींसाठी गावनिहाय सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले असून, सर्वात मोठ्या कोळकीचे सरपंचपद खुल्या महिलांसाठी, तर ...

फलटण : तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींसाठी गावनिहाय सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले असून, सर्वात मोठ्या कोळकीचे सरपंचपद खुल्या महिलांसाठी, तर साखरवाडीचे सरपंचपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. १९० गावात अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले असले तरी काही गावात कोणीच सदस्य त्या प्रवर्गाचा नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आज तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या प्रतिभा धुमाळ, सचिन रणवरे, बाळासाहेब ठोंबरे, संजय कापसे, प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, पोलीस निरीक्षक भरत किंद्रे, नायब तहसीलदार आर. सी. पाटील, अंकुश इवरे आदींची उपस्थिती होती.

प्रवर्गानुसार जाहीर झालेले गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण १९ जागा होत्या. यापैकी महिलासांठी १०, तर खुल्यासाठी ९ ग्रामपंचायती आरक्षित होत्या. यापैकी महिलांसाठी तावडी, धुमाळवाडी, धुळदेव, जाधववाडी (फ), मुळीकवाडी, शेरेवाडी (ढवळ), घाडगेवाडी, माळेवाडी, सोनगाव या जाहीर करण्यात आल्या, तर चिठ्ठीद्वारे मिरेवाडी (दालवडी). खुल्या गटासाठी शेरे शिंदेवाडी, तांबवे, मिरेवाडी (कुसूर), कोर्हाळे, फरांदवाडी, साठे, डोंबाळवाडी, सांगवी, घाडगेमळा. अनुसूचित जमातीसाठी केवळ एक ग्रामपंचायत राखीव होती. लोकसंख्येच्या निकषानुसार जोर (कुरवली खु.) हे गाव या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले. सदर ग्रामपंचायत चिठ्ठीद्वारे या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तालुक्यातील ७२ गावांमधून ३५ गावे चिठ्ठीद्वारे निवडण्यात आली. यामध्ये महिलांसाठी जोर (वाखरी), होळ, पवारवाडी, परहर बु., झिरपवाडी, पिंपळवाडी (साखरवाडी), तिरकवाडी, चांभारवाडी, विंचुर्णी, भाडळी खु., टाकुबाईचीवाडी, हणमंतवाडी, कोरेगाव, जावली, परहर खु., कांबळेश्वर, नांदल, अलगुडेवाडी ही १८ गावे, तर खुल्या गटासाठी टाकळवाडे, सालपे, चव्हाणवाडी, मिरढे, रावडी खु., निंबळक, मानेवाडी, विडणी, विठ्ठलवाडी, खुंटे, जाधववाडी (तामखडा), वाठार (निंबाळकर), आरडगाव, कुरवली (बु), दऱ्याचीवाडी, सासकल, ऊळुंब ही १७ गावे आरक्षित झाली. खुला प्रवर्गासाठी एकूण - ७६ ग्रामपंचायती आरक्षित होत्या. यापैकी महिलांसाठी ३८, तर खुल्या गटातील ३८ जागांचा समावेश होता. यावेळी ३९ पैकी ३८ गावे महिलांसाठी चिठ्ठीद्वारे निवडण्यात आली ती पुढीलप्रमाणे : वडजल, बिबी, सोनवडी खु., कापडगाव, काशिदवाडी, पिंप्रद, हिंगणगाव, खटकेवस्ती, दालवडी, मुरुम, रावडी बु., गिरवी, आसू, मिरगाव, झडकबाईचीवाडी, जिंती, तरडफ, कुसुर, गोळेगाव, सस्तेवाडी, सुरवडी, मुंजवडी, सरडे, मठाचीवाडी, वाखरी, खामगाव, शेरेचीवाडी (हिंगणगाव), वडगाव, सासवड, राजाळे, कोळकी, निंभोरे, आदर्की खु., जाधवनगर, फडतरवाडी, सावंतवाडी, गोळेवाडी, दुधेबावी.

उर्वरित खुल्या गटासाठी माझेरी (पु), नाईकबोमवाडी, चौधरवाडी, शिंदेमाळ, मलवडी, भाडळी बु., ठाकुरकी, बोडकेवाडी, खडकी, वाघोशी, आदर्की बु., तरडगाव, वडले, बरड, सोनवडी बु., शिंदेनगर, पाडेगाव, उपळवे, गोखळी, वेळोशी, पिराचीवाडी, ढवळेवाडी (निं), तडवळे, ताथवडा, काळज, कापशी, सोमंथळी, खराडेवाडी, आंदरुड, आळजापूर, शिंदेवाडी, कुरवली खु., भिलकटी, ढवळ, निरगुडी, गुणवरे, ढवळेवाडी (आसू), राजुरी यापैकी महिला प्रवर्गासाठी ३८ जागांसाठी ३९ चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. त्यामध्ये राजुरीची चिठ्ठी न उचलली गेल्याने या ग्रामपंचायतीचा समावेश खुल्या प्रवर्गातील खुल्या गटामध्ये समावेश झाला.

चौकट -

अनुसूचित जातीच्या सरपंचपदासाठी १९ गावांचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. परंतु सदर गावांपैकी किमान १२ गावांमध्ये या प्रवर्गातील सदस्य नाहीत. त्यामुळे येथे सरपंच पद रिक्त राहण्याची शक्यता आहे. सदर प्रकार नवनिर्वाचित सदस्यांनी प्रांत शिवाजीराव जगताप व तहसीलदार समीर यादव यांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु त्यांनी या निर्णयाचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात टोलविला. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार, याकडे ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत.

चौकट

बहुचर्चित अशा साखरवाडी (पिंपळवाडी) ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. तेथे राजे गट ७, विक्रम भोसले गट ७, प्रल्हादराव पाटील गट २ असे बलाबल असून, येथे सरपंच पदासाठी प्रचंड रस्सीखेच होणार आहे. प्रल्हादराव पाटील गटाच्या दोन्ही सदस्यांचे महत्व वाढले आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता साखरवाडी सरपंच पदाकडे लागले आहे.