शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढवणाऱ्या योजनांबाबत सकारात्मक - राज्यपाल रमेश बैस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:13 IST

उदयनराजेंसमवेत बैठकीत सविस्तर चर्चा

महाबळेश्वर : महाबळेश्वर मुक्कामी असलेल्या राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी ‘नमामि गंगे’ योजनेच्या धर्तीवर कृष्णा नदीचे सुशोभीकरण व शुद्धीकरण, मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी शिवस्वराज्य सर्किट याेजना यासह राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी नमूद केले.खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्यासमवेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये उगम पावून, सातारा, सांगली जिल्ह्यांतून पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या कृष्णा नदीचे सुशोभीकरण आणि शुद्धीकरण करण्यासाठी ‘नमामि गंगे’ योजनेच्या धर्तीवर ‘नमामि कृष्णा’ योजना महाराष्ट्र आणि अन्य राज्यांत राबविणे, बौद्ध सर्किट किंवा रामायण सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे, या शिवस्वराज्य सर्किट योजनेमधून, छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास वृद्धिंगत करणे, मराठा साम्राज्याच्या राजगड, रायगड आणि सातारा या तीन राजधान्यांचा सूचिबद्ध आणि समयबद्ध विकास करणे, पानिपत ते तंजावरमधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधणे, जेणेकरून जगभरातून इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देतील आणि पर्यटनालाही अधिक चालना मिळेल, आदी मुद्दे उदयनराजे यांनी मांडले. तसेच प्रतापगडसह राज्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासाकरिता स्थापित केलेल्या उच्चस्तरीय सनियंत्रण समितीवर, संसद-विधिमंडळ प्रतिनिधींसह, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यासाठी राज्याने पावले टाकणे, या प्रमुख विषयांवरही चर्चा झाली. राज्यपाल रमेश बैस यांनी उदयनराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत राज्यशासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे नमूद केले. यावेळी जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, ॲड. विनीत पाटील, प्रीतम कळसकर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamesh Baisरमेश बैसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेtourismपर्यटन