भाजपच्या ओबीसी मोर्चा युवक प्रदेशाध्यक्षपदी पोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST2021-09-10T04:47:51+5:302021-09-10T04:47:51+5:30

म्हसवड : भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी करण सुनील पोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या ...

Pore as BJP's OBC Morcha Youth State President | भाजपच्या ओबीसी मोर्चा युवक प्रदेशाध्यक्षपदी पोरे

भाजपच्या ओबीसी मोर्चा युवक प्रदेशाध्यक्षपदी पोरे

म्हसवड : भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी करण सुनील पोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून म्हसवड येथील करण पोरे यांनी जबाबदारीने काम करून कामाचा ठसा उमटवला होता. त्यामुळे याची दखल घेऊन त्यांची युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

दरम्यान, करण पोरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यात युवकांचे संघटन वाढविणार आहे. तसेच ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना भाजपशी जोडले जाईल. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही लढाही उभारणार असल्याचे सांगितले.

निवडीबद्दल करण पोरे यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर आदींनी कौतुक केले.

फोटो मेलवर...

फोटो ओळ : भाजप ओबीसी मोर्चा युवक प्रदेशाध्यक्षपदी करण पोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

\\\\\\\\\\\\\\\\\

Web Title: Pore as BJP's OBC Morcha Youth State President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.