लोकसंख्या 900 कूपनलिका 3500 डांभेवाडी शिवारात

By Admin | Updated: April 6, 2016 00:21 IST2016-04-05T22:57:10+5:302016-04-06T00:21:50+5:30

जमिनीची चाळण : राज्याबाहेरीलही पाणाड्यांना आलंय भलतंच डिमांड

Population 900 Bunker 3500 Dambhwadi Shivar | लोकसंख्या 900 कूपनलिका 3500 डांभेवाडी शिवारात

लोकसंख्या 900 कूपनलिका 3500 डांभेवाडी शिवारात

विठ्ठल नलवडे -- कातरखटाव दुष्काळात उन्हाचे चटके सोसत असलेले शेतकरी जमिनीतील पाणी शोधण्यासाठी ना-ना तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. खोल-खोल कूपनलिका घेऊन, विहिरीत उभी, आडवी कूपनलिका घेतल्या जातात, हे सर्वांना माहीत आहेच; पण माण तालुक्यातील डांभेवाडीत कहरच झाला आहे. नऊशे लोकसंख्येच्या या खेड्यात तब्बल साडेतीन हजार कूपनलिका घेतल्या आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली आहे. गेल्या दहा-वीस वर्षांत विहिरींवरील मोट, इंजिनच्या जमान्यात बागायती पीक घेण्याकडे फारसा कल नसायचा. सध्या शेतकऱ्यांमध्ये विभक्त कुटुंबपद्धती वाढायला लागल्यामुळे जमिनी तेवढ्याच; पण बागायत करण्याकडे जास्त कल वाढला आहे. डांभेवाडीत १९८३ मध्ये शेतकऱ्यांनी केवळ १,६३२ रुपयांमध्ये पहिली कूपनलिका घेतली. त्यावेळी ११ फुटांवर ४ इंची पाणी लागत होते. १६ वर्षे झाली तरी चांगल्या पद्धतीने बोअरला पाणी टिकत होते. सद्य:स्थितीत १६०० रुपयांत केसिंग पाईपही येत नाही. त्याचा दर सहा हजार रुपये इतका झाला आहे. अर्धा एकर क्षेत्र असलेला शेतकरीही आठ-दहा कूपनलिका घेत आहे. गावातील शेतकरी दर २० ते २५ फुटांवर आपापल्या जमिनीत बोअर घेत आहे. कोण ४४ तर कोण ३० बोअर घेतोय. त्यातल्या कुणाच्या दोन बोअर सुरू आहेत, तर काही शेतकरी जमिनीची चाळण करून बेजार झाले आहेत. पण तरीही कुपनलिका घेण्याचे काम सुरूच आहे. पाणाड्यांच्या ना-ना तऱ्हा... कोण दुपट्याची काठी आपटतो, तर कोण पारंणं पाणी दाखवतो. कोण गजाणं पाणी दाखवतो, तर कोण नारळ उलटा धरतो. काही पाणाडी रक्त गटाचा बाव करतात. काहींना वाटते ‘मी पायाळू आहे’ जमिनीवर चालत असताना पाणाड्याच्या पायाला जिथे मुंग्या आल्यासारखं वाटेल, अशा ठिकाणी पाणी आहे,’ अशी माहिती बागायतदार गौतम बागल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भोवतालच्या सजीव सृष्टीचा अभ्यास करून पाणी दाखवणारे पाणाड्यांचा अंदाज ९० टक्के यशस्वी ठरतात. काही पाणाडी जाग्यावर थांबून पाणी काढूनच निघून जातात. तर काहीजण नशिबाला दोष देऊन जातात. त्यामुळे पाणाड्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हे ठरवलं पाहिजे. - नाना शिंदे, पाणाडी, कातरखटाव पाणाड्यांच्या तऱ्हा काही पाणाड्यांचे अंदाज वीस-वीस वेळा कूपनलिका घेऊन चुकले आहेत. अशावेळी त्यांची कारणंही ठरलेली आहेत. ‘जागाच थोडी बदलेली दिसतेय, कुणी दगड तर उचलला नाही ना, ...मग या जागी देवस्थानच आहे, असं वाटतंय.’ कोण म्हणतो, ‘देवाची जत्रा करा,’ असे सांगून पाणाडी तिथून पळवाटा काढून निघून जाताना दिसतायंत. ५०० फुटांवर धुरळा ‘जाऊ दे अजून दोन पारा खाली... रान थोड मऊ लागतंय,’ असं म्हणून काहीजण शेतकऱ्यांना घोड्यावर बसवतात. नंतर चारशे ते पाचशे फुटांवर धुरळाच उडत राहिला की, बघणारी लोकं तिथून निघून जातात. डांभेवाडी परिसरात शंभर फुटांच्या पुढे मांजरासारखा खडक लागल्यानंतर त्याच्या खाली पाणी धरणारा खडक नसल्यामुळे पाणी लागत नाही, असं जाणकारांचं मत आहे. भोवतालच्या सजीव सृष्टीचा अभ्यास करून पाणी दाखवणारे पाणाड्यांचा अंदाज ९० टक्के यशस्वी ठरतात. काही पाणाडी जाग्यावर थांबून पाणी काढूनच निघून जातात. तर काहीजण नशिबाला दोष देऊन जातात. त्यामुळे पाणाड्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हे ठरवलं पाहिजे. - नाना शिंदे, पाणाडी, कातरखटाव

Web Title: Population 900 Bunker 3500 Dambhwadi Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.