शिरसवडी -वाकळवाडी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:48+5:302021-02-05T09:17:48+5:30
औंध : शिरसवडी-वाकळवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. लवकरात लवकर या रस्त्याचे ...

शिरसवडी -वाकळवाडी रस्त्याची दुरवस्था
औंध : शिरसवडी-वाकळवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शिरसवडी- वााकळवाडी रस्ता ग्रामीण भागातील प्रमुख रहदारीचा रस्ता आहे. दुरवस्थेमुळे पावसाळ्यात अनेकजण पडून जखमी झाले आहेत. या मार्गाने शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्ता असल्याने शेतकऱ्यांना याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर ठरावीक अंतरापर्यंत डांबर आहे. मात्र, गावच्या दिशेने दोन किलोमीटरपर्यंत कसलेच डांबर नाही. मोठमोठे खड्डे पडले आहेत, तेही खड्डे भरण्याची संबंधित विभाग तसदी घेत नाही. त्यामुळे नेमकी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
कोट..
शिरसवडी-वाकळवाडी रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून, संबंधित विभागाने त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-उल्हास इंगळे, उपसरपंच, शिरसवडी
३१औंध
फोटो:-शिरसवडी-वाकळवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, याकडे संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. (छाया-रशिद शेख)