खात्रीशीर रोजगारामुळे ‘पॉलिटेक्निक’ला यंदाही गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:40+5:302021-09-17T04:46:40+5:30
कल वाढलेलाच : जिल्ह्यात उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थ्यांचे अर्ज जास्तीचे लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनामुळे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे महत्त्व नव्याने ...

खात्रीशीर रोजगारामुळे ‘पॉलिटेक्निक’ला यंदाही गर्दी
कल वाढलेलाच : जिल्ह्यात उपलब्ध जागांपेक्षा विद्यार्थ्यांचे अर्ज जास्तीचे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनामुळे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे महत्त्व नव्याने समोर आले आहे. त्यामुळे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराची संधी, हमी असल्याने यावर्षी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील पॉलिटेक्निकमधील एकूण जागांसाठी यंदाही जादाचे अर्ज दाखल झाले आहेत.
पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत या पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणाचा खर्च कमी आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी पदवीच्या शिक्षणाचा पाया भक्कम होण्यास मदत होते. कोणताही पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास पूरक सुविधा, वातावरण आहे. कोरोनामुळे रोजगाराभिमुख शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याने यावर्षी पॉलिटेक्निककडील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे.
चौकट :
संगणक, इलेक्ट्रिकलकडे ओढा
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे विविध क्षेत्रांत ऑनलाइन, डिजिटलचे महत्त्व वाढले आहे. भविष्याचा वेध घेत अनेक विद्यार्थ्यांनी संगणक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ मेकॅनिकल, सिव्हील, आदी अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात आहे.
कोट
गेल्यावर्षी सुमारे ४ हजार अर्ज दाखल झाले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली असल्याचे शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रिया समन्वयक यांनी सांगितले.
- अतुल शहा, शिक्षणतज्ज्ञ, सातारा
तांत्रिक शिक्षणाचे समजलेले महत्त्व आणि शिक्षणाचा कमी खर्च, रोजगाराच्या अधिक संधी असल्याने पॉलिटेक्निकमधील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसते.
- नितीन उल्मेक, सातारा