शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी ११ तालुक्यांतील प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्मचारी व मतदान प्रक्रियेवेळी बंदोबस्तासाठी असणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील २५६ गावांकडे रवाना झाले आहेत.सोमवारी मतदान मशीनची चाचणी करून मतदानाला सुरुवात होणार आहे. सोमवारी सकाळी साडेसात ते साडेपाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी ११ तालुक्यांतील प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्मचारी व मतदान प्रक्रियेवेळी बंदोबस्तासाठी असणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील २५६ गावांकडे रवाना झाले आहेत.सोमवारी मतदान मशीनची चाचणी करून मतदानाला सुरुवात होणार आहे. सोमवारी सकाळी साडेसात ते साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी सातारा तालुक्यातील नित्रळ ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली. तर ६२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २५६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.सरपंच व सदस्य अशा एकूण २ हजार ३६७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ८८५ केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. सातारा तालुक्यात ९७, जावळीत २७, कोरेगावात १३२, वाईत ३२, खंडाळ्यात १६, महाबळेश्वरात ३, कºहाडात १३६, पाटणमध्ये २१८, माणमध्ये ७६, खटाव तालुक्यात ५४, फलटणमध्ये ९४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर दोन मतदान मशीन असणार आहेत. मतदानादरम्यान काही बिघाड झाल्यास नवीन मशीन त्या ठिकाणी बसविली जाणार आहे. मतदानादिवशी सोमवारी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान मशीनची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतर मतदानाला सुरुवात होईल.सातारा भू-विकास बँक सभागृह, जावळी तहसील कार्यालय, मेढा, कोरेगाव गणेश हॉल, सरस्वती विद्यामंदिर, वाई देशभक्त किसन वीर सभागृह पंचायत समिती, खंडाळा किसन वीर सभागृह, पंचायत समिती, महाबळेश्वर तहसील कार्यालय, कºहाड दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र, शनिवार पेठ, पाटण शासकीय धान्य गोदाम, शिरळ, माण डी. एस. पाटील सभागृह, खटाव नवीन प्रशासकीय इमारत, वडूज, फलटण नवीन धान्य गोदाम, फलटण येथे स्ट्राँग रूम करण्यात आल्या असून, याच ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.मायणीत पोलिसांचे संचलनमायणी ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मतदान होत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण बाजार पेठेतून संचलन केले. यावेळी पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी उपस्थित होते.मायणी, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. मायणी हे गाव संवेदनशील आहे. त्यामुळे पोलिस दलाने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच पोलिस दलाकडून यापूर्वीच १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी होत असलेल्या मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रविवारी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी गावात संचलन केले. यावेळी पोलिस ठाण्यापासून चाँदणी चौक, मराठी शाळा, बसस्थानक, चावडी चौक, उभी पेठ, नवी पेठ येथून पुन्हा मुख्य रस्त्याने पोलिस ठाण्यापर्यंत हे संचलन करण्यात आले.