शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिवेंद्रसिंहराजेंनी मास भवनात सत्कार झालेले मुख्यमंत्री झाल्याची गुगली टाकली, उदय सामंतांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले..

By दीपक देशमुख | Updated: April 5, 2025 13:46 IST

दीपक देशमुख सातारा : एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले अन् उदय सामंत हे  दिग्गज मंत्री ...

दीपक देशमुखसातारा : एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले अन् उदय सामंत हे  दिग्गज मंत्री एकत्र आले. यावेळी त्यांच्यात दिलखुलास आतषबाजी रंगली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मास भवनात ज्यांचा सत्कार झाला ते नारायण राणे, अशोक चव्हाण हे पुढे मुख्यमंत्री झाल्याची गुगली हळूच टाकली. यावर उदय सामंत यांनीही माझा करेक्ट कार्यक्रम करायचे ठरले काय, असे मिश्कीलपणे सांगत मीच शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देतो की त्यांनी मोठ्या पदावर जावे, म्हणत चेंडू त्यांच्याच कोर्टात टोलविला.सातारा येथे लोकार्पण सोहळ्यानंतर मास भवन सभागृहात उद्योजकांच्या मेळाव्यात दोन्ही मंत्री महोदयांनी एकमेकांची फिरकी घेतली. सुरुवातीला शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, राष्ट्रवादीतून मी आणि सामंत दोघेही आमदार झालो. पुढे सामंत यांनी वेगळा मार्ग धरला व शिवसेनेतून पुढे गेले. आम्ही मात्र राष्ट्रवादीत राहिलो अन् मागे पडलो. मात्र लगेच पुढे आमचे सरकार आले नाही म्हणून मागे पडलो, अशी पुस्तीही जोडली.  मास भवन येथे यापूर्वी अशोक चव्हाण, नारायण राणे हे सत्कार घेऊन गेले. ते सर्व पुढे मुख्यमंत्री झाले. उदय सामंत तुम्हाला अडचणीत आणत नाही. पण, आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत, असे सांगत सामंत यांना चिमटा काढला. सामंत यांनी आपल्या भाषणात हा धागा अचूक पकडला. सामंत मिश्कीलीने म्हणाले, आठ दिवसांपूर्वी ज्यावेळी मला उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं, त्यावेळीच माझा करेक्ट कार्यक्रम करण्याचं ठरलं होतं काय? मी राजकारणात पुढं जावं, अशी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका असली तरी माझ्या राजकीय मर्यादा मला माहीत आहेत. त्यामुळे मीच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शुभेच्छा देतो की, त्यांनी आहे त्यापेक्षा मोठ्या पदावर जावे, असे सांगत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा चेंडू त्यांच्याच कोर्टात टोलवला

दोन्ही राजेंशी सुरेख समन्वय.. आयटी पार्कसाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांनीही दोन जागा सुचविल्या आहेत. याचा उल्लेख करीत मी सुरूची येथे सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनाही भेटून चर्चा केल्याचे सामंत यांनी सांगितले.  एका ठिकाणी आयटी पार्क सुरू होईल तर एका ठिकाणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करून कौशल्य विकास केंद्र सुरू करू, असे सांगत त्यांनी सुरेख समन्वयही साधला.

राजकीय गुगली..मंत्री उदय सामंत व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी जरी  एकमेकांची फिरकी घेतली असली तरी त्या दोघांमधील जुनी मैत्री या निमित्ताने पहायला मिळला. त्यांच्या राजकीय गुगलीने हास्यतुषार उडाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेUday Samantउदय सामंतPoliticsराजकारण