शिक्षकांच्या प्रांगणात राजकीय पक्षांची कसरत

By Admin | Updated: May 31, 2014 00:29 IST2014-05-31T00:29:30+5:302014-05-31T00:29:57+5:30

पुणे शिक्षक मतदारसंघ : साळुंखेंना ‘भाजप’ तर राजमानेंना ‘काँग्रेस’चे बळ

Political parties workout in teachers' camp | शिक्षकांच्या प्रांगणात राजकीय पक्षांची कसरत

शिक्षकांच्या प्रांगणात राजकीय पक्षांची कसरत

प्रमोद सुकरे ल्ल कºहाड पुणे विधानपरिषद शिक्षक मतदार संघाची निवडणूक २० जूनला होत आहे. यात शिक्षक परिषदेने विद्यमान आमदार भगवानराव साळुंखे यांना ‘भाजप’ने पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे. तर ‘टीडीएफ’चे प्राचार्य डॉ. मोहन राजमानेंना काँग्रेसने प्रथमच अधिकृत उमदेवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांनाही शिक्षक संघटनांबरोबर राजकीय पक्षांचे बळ मिळाले आहे. साहजिकच केवळ शिक्षक संघटनांच्या जीवावर या निवडणुकीत उतरणार्‍या इतर उमेदवारांना याची झळ सोसावी लागणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अन् सोलापूर अशा पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या मतदार संघासाठी आहे. त्यामुळे निवडणूक लढविताना उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. सुमारे ८४ हजार शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचणे अन् पसंती क्रमांकाची मते मागणे हे सोपे काम नाही. त्यासाठी शिक्षक चळवळीत सक्रिय असणेच आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील असणारे विद्यमान आमदार भगवानराव साळुंखे यांनी वर्षभरापूर्वीच या निवडणुकीचा शड्डू ठोकला आहे. शिक्षक परिषदेचे ते उमेदवार आहेत. त्यांना ‘भाजप’ने अधिकृत पाठिंबाही जाहीर दिला आहे. गतवेळी दुसर्‍या क्रमांकावर राहिलेले प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनीही वर्षभरापासून तयारी सुरू ठेवली आहे. ‘टीडीएफ’ने त्यांना यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याबरोबरच टीडीएफच्या माध्यमातून सातारचे प्रा. दशरथ सगरे व बारामतीचे गणपतराव तावरे यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्णय पक्का केला आहे. गेल्यावेळी आमदार साळुंखे यांच्याबरोबर असणारे विनाअनुदान कृती समितीचे दत्ता सावंतही यावेळी मैदानात उतरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होईल, असेच सध्याचे चित्र आहे. अंदाजे सन १९५२-५३ पासून शिक्षकांना विधानपरिषदेवर प्रतिनिधीत्व मिळू लागले. मात्र, ही निवडणूक १९७० नंतरच सर्व शिक्षकांना समजली, असेच म्हणावे लागेल. कारण ‘टीडीएफ’तर्फे प्रकाशराव मोºहाडीकर यांनी ही निवडणूक लढविली अन् ती गाजलीही. तोपर्यंत ही निवडणूक कधी झाली हे समजतही नव्हती, असे काही जाणकार शिक्षक सांगतात. अलीकडच्या काही वर्षांत तर शिक्षक मतदार संघातील निवडणुकांना राजकीय रंग चढू लागला आहे. यंदाची ही निवडणूकही त्याला अपवाद नाही. भाजप अन् काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे यात नक्की कोणाची डाळ शिजणार, यासाठी थोडा वेळ वाटच पाहावी लागणार आहे.

Web Title: Political parties workout in teachers' camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.