शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

प्रीतिसंगमावर राजकीय नेत्यांची खलबतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:53 IST

कºहाड : कºहाडला मुक्कामी असणाऱ्या जाणत्या राजाच्या भेटीला साताºयाचे थोरले राजे सकाळी साडेसातच्या सुमारासच पोहोचले. पवार हॉटेलात तिसºया मजल्यावर ...

कºहाड : कºहाडला मुक्कामी असणाऱ्या जाणत्या राजाच्या भेटीला साताºयाचे थोरले राजे सकाळी साडेसातच्या सुमारासच पोहोचले. पवार हॉटेलात तिसºया मजल्यावर असल्याने उदयनराजे जिना चढत वर पोहोचले. तोवर पवार खोलीतून बाहेर आले. मग शरद पवारांनी राजेंना ‘लिफ्ट’ दिली.स्वागत कक्षात शरद पवार आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले. ते उरकल्यावर कोचवर बसलेल्या पवारांनी राजेंना शेजारी बसायला सांगितले. तर दुसºया बाजूला श्रीनिवास पाटील बसले. आता दोघांना शेजारी घेऊन बसलेले पवार लोकसभा उमेदवारी निश्चित करताना काय डावं-उजवं करणार, हे पाहावं लागेल.आमदार बाळासाहेब पाटलांनी मग थोरल्या पवारांना आता स्मृतिस्थळाकडे निघूया का? असे विचारताच ‘तुम्ही म्हणाल तसं,’ असं सांगत शरद पवार उठले अन् शरद पवारांसह उदयनराजे अन्य नेतेगण आपापल्या गाड्यात बसले. गाड्यांचा ताफा प्रीतिसंगमावर पोहोचला. यशवंतरावांना अभिवादन केले. शेजारी हिरवळीवर भजनाचा कार्यक्रम होता. तेथे सगळे जाऊन बसले; पण काही मिनिटांतच राजेंनी पवारांच्या कानात खूप लग्न आहेत आज, असे म्हणून हात जोडून निरोप घेतला.मधूनच निघालेल्या उदयनराजेंना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठलं. काही प्रश्नांवर छेडले असता त्यांनी, ‘माझा घसा बसलाय तेव्हा काय बोलू?’ असे विचारले. मग तुम्ही घड्याळाच्या की कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढणार? असे विचारताच, ‘हे पाहा, मी हातात घड्याळ घातलंय अन् आताच पवार साहेबांना कमळाच्या फुलांचा बुके दिलाय,’ असे बुचकळ्यात टाकणारे उत्तर देत त्यांनी मीडियाचाही निरोप घेतला.आता राजेंची गाडी नेमकी कुठल्या लग्नाला गेली, याचा मागोवा घेतला तर ते थेट विमानतळावर पोहोचल्याचे समजले. मुख्यमंत्री पंत विमानतळावर उतरताच राजेंनी त्यांचे स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यशवंतरावांना अभिवादन करायला प्रीतिसंगमाकडे रवाना झाले; पण थोरल्या राजेंनी तेथेच तळ ठोकला. देवेंद्र फडणवीस पुन्हा विमानतळावर आल्यावर मात्र त्यांची उदयनराजेंबरोबर पंधरा मिनिटे कमराबंद चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजला नाही. मात्र, या कमराबंद चर्चेवेळी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे व फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर आतमध्ये होते, हे महत्त्वाचे.चव्हाण साहेब तुम्हालातरी यांच्या मनातील कळेल का ?दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कºहाडच्या स्मृतिस्थळाला नतमस्तक होण्यासाठी राजकीय मांदियाळी प्रत्येक वर्षी जमा होते. यंदाही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्वजित कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत येऊन स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर पाऊण तासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरही ते पुन्हा अभिवादनासाठी आले होते.राष्ट्रवादी आणि काँगे्रसचे कार्यकर्ते स्वतंत्ररीत्या आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी, मंत्री आलेले दिसले; पण त्या गर्दीत फडणवीसांचे मित्र; पण सेनेचे आमदार शंभूराज देसाईही होते. मग त्याची चर्चा तर होणारच ! याशिवाय खासदार उदयनराजे भोसले यांनीतर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. यावरुन नक्की काय-काय होऊ शकते, हे दिसून आले.देशमुखांनी सोडली नाही पवारांची पाठ...सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी या दौºयात थोरल्या पवारांची पाठ काही सोडली नाही. पवार उतरलेल्या हॉटेलमध्ये सकाळी पोहोचलेले देशमुख पवारांची गाडी पुण्याला रवाना होईपर्यंत त्यांच्याबरोबरच होते. त्यांची ही जवळीक पाहता आणखी एका सनदी अधिकाºयाला राष्ट्रवादीची लॉटरी लागणार का? अशी चर्चा उपस्थितांच्यात होती.