बनावट कागदपत्राच्या आधारे राजकीय लाभ

By Admin | Updated: June 6, 2016 00:41 IST2016-06-05T23:38:55+5:302016-06-06T00:41:37+5:30

तक्रार : पाचगणीच्या नगराध्यक्षांवर गुन्हा

Political gains based on a fake document | बनावट कागदपत्राच्या आधारे राजकीय लाभ

बनावट कागदपत्राच्या आधारे राजकीय लाभ

पाचगणी : पाचगणी नगराध्यक्षा लक्ष्मी राजेंद्र कऱ्हाडकर यांनी बनावट कागदपत्रे सादर करून तीनवेळा नगराध्यक्षपद मिळवत शासनाची फसवणूक केल्याबद्दलचा गुन्हा दीपक कांबळे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.पाचगणी पोलिस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी पाचगणीच्या नगराध्यक्षपदी कऱ्हाडकर यांची निवड झाली. कऱ्हाडकर यांनी इतर मागास प्रवर्गातून अर्ज भरला होता. परंतु त्यांचे लग्नापूर्वीचे नाव मोनीषा हदी राजबल्ली असे असून, त्या मुस्लीम समाजाच्या आहेत. तो समाज इतर मागास प्रवर्गामध्ये समाविष्ट नाही. असे असताना त्यांनी जयहिंद महाविद्यालय चर्चगेट (मुंबई) या महाविद्यालयातून १९८८ मध्ये शाळा सोडल्याचा दाखला घेतला आहे. या दाखल्यावर त्यांचा ‘इस्लाम’ असा जातीचा उल्लेख नमूद केला आहे. २००१ मध्ये जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाची निवड ओबीसी राखीव होती. ही निवडणूक लढविण्यासाठी व आरक्षित जागेचा फायदा घेण्यासाठी शाळेच्या दाखल्याचा गैरवापर करून जातीच्या दाखल्यासाठी त्याचा पुरावा म्हणून उपयोग कऱ्हाडकर यांनी केला आहे. या जातीच्या दाखल्यावरून त्यांनी २००१, २००६ आणि २०१४ अशी नगरसेवक व नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि पद मिळविले. कऱ्हाडकर यांनी राजकीय लाभ घेण्यासाठी शासनाची व जनतेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादित दीपक कांबळे यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

‘राजकीय आकसापोटी आणि नजीकच्या काळात येऊ घातलेल्या पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेले हे षड्यंत्र आहे. या अगोदर मागील निवडणुकांच्या वेळी कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. मी निर्दोष असून, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. हा केवळ राजकीय स्टंट असून, पाचगणीतील सुज्ञ जनतेला अशा तक्रारी का केल्या जातात हे ज्ञात आहे.’
- लक्ष्मी कऱ्हाडकर, नगराध्यक्षा

Web Title: Political gains based on a fake document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.