शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

पोलिसाचा महिला पोलिसावर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:50 IST

पोलीस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून अनिल सुभाष पवार (वय २७, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोलिसाचा महिला पोलिसावर अत्याचार पोलिसावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल

सातारा : पोलीस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून अनिल सुभाष पवार (वय २७, रा. शंभर फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार युवती २२ वर्षांची आहे. ती सध्या पोलीस म्हणून कार्यरत आहे. पोलीस युवतीची व अनिल पवार याच्याशी ओळख आहे. या ओळखीतूनच संशयित पवार याने पोलीस युवतीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

यानंतर संशयिताने तुझ्याशी लग्न करतो, असे वचन दिले. यातून संशयिताने पोलीस युवतीकडून घर बांधण्यासाठी ५० हजार रुपये घेतले. बराच कालावधी गेल्यानंतर पोलीस युवतीने अनिल पवार याला लग्नाबाबत विचारल्यानंतर त्याने नकार दिला. तसेच त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यासही नकार देऊन पोलीस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली.दरम्यान, संशयित अनिल पवार या पोलिसाच्या कुटुंबीयांनीही पोलीस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली आहे. याबाबत पोलीस युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. ही सर्व घटना १७ जुलै २०१८ ते १४ जून २०१९ या कालावधीत घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीवरून पोलिसांनी सांगली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अनिल पवार याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास महिला फौजदार वर्षा डाळिंबकर या करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर