शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सदावर्तेंच्या कोठडीबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, न्यायालयात आज हजर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:24 IST

खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सातारा : आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची रविवारी पोलीस ठाण्यात एक तास कसून चाैकशी करण्यात आली. त्यानंतर जाबजबाब झाल्यानंतर त्यांना पुन्हा कोठडीत नेण्यात आले. दरम्यान, बारामती येथे सदावर्तेंना काळे फासणाऱ्यांना बक्षीस जाहीर केल्याने सातारा पोलिसांनी सदावर्तेंच्या कोठडीसमोरील बंदोबस्तात आणखी वाढ केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सदावर्ते यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने पुणे येथे फाॅरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी ॲड. सदावर्ते यांना पुन्हा कोठडीतून बाहेर काढण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यातील केबिनमध्ये त्यांची तासभर चाैकशी करण्यात आली. 

कोल्हापूर पोलिसांचा ताबा मिळण्यासाठी अर्जॲड. सदावर्ते यांच्यावर कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कोल्हापूर पोलिसांनी मुंबई येथील गोरेगाव न्यायालयात सदावर्तेंचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. सातारा न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सदावर्तेंना आर्थररोड कारागृहात नेले जाणार आहे. त्यानंतर तेथून कोल्हापूरच्या पोलिसांकडे त्यांचा ताबा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालयSatara areaसातारा परिसर