सातारा : खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यातून लॉकअप तोडून पलायन केलेल्या दरोडेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. राहुल भोसले असे या आरोपीचे नाव आहे.दरम्यान लॉकअपमधून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाल्यामुळे औंध पोलीस ठाण्यातील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हा ताण दिसून येत होता. पोलीस ठाण्याच्या परीसरात सकाळपासून सन्नाटा पसरला होता.लॉकअपचे दार तोडल्यानंतर पलायन केलेल्या पाच दरोडेखोरांनी पोलीस ठाण्यातील पोलिसांना मारहाण देखील केली होती. सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले (सर्व रा. बीड व अहमदनगर जिल्हा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना आज, सोमवारी पहाटे तीन वाजता घडली.ही घटना घडताच औंध पोलीस शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते. संशयित आरोपी जवळच वरुड सिद्धेश्वर कुरोली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी राहुल भोसलेला पकडण्यात पोलिसांना यश आले.
लॉकअप तोडून पळालेल्या एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:56 IST