खंबाटकी घाटात सापडलेले पैसे पोलिसांनी केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST2021-02-21T05:13:37+5:302021-02-21T05:13:37+5:30
सातारा : चारचाकीतून एका महिलेची पर्स खंबाटकी घाट सुरू होताना पडली. ही पर्स वाहतूक पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी पर्समधील कादगपत्रांवरून ...

खंबाटकी घाटात सापडलेले पैसे पोलिसांनी केले परत
सातारा : चारचाकीतून एका महिलेची पर्स खंबाटकी घाट सुरू होताना पडली. ही पर्स वाहतूक पोलिसांना सापडल्यानंतर त्यांनी पर्समधील कादगपत्रांवरून फोन करून ही पर्स संबंधित महिलेला परत केली. यामुळे पोलिसांचे सर्वत्र काैतुक होत आहे.
पूजा मुडलियार ही महिला कुटुंबीयांसमवेत पुण्याहून साताऱ्याच्या दिशने कारमधून निघाली होती. खंबाटकी घाट सुरू होत असतानाच त्यांची पर्स गाडीतून खाली पडली. ही पर्स सहायक फाैजदार घनवट, हवालदार सोळस्कर, बागल, जाधव, मनोज गायकवाड यांना पेट्रोलिंग करत असताना सापडली. त्यांनी पर्समध्ये असलेल्या कादगपत्रावरून संबंधितांना फोन लावला. त्यानंतर ही पर्स पूजा मुडलियार या महिलेची असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पर्समध्ये ५ हजारांची रोकड, आधारकार्ड आदी कागदपत्रे होती. ही पर्स परत केल्यानंतर पूजा मुडलियार यांनी महामार्ग पोलिसांचे आभार मानले.