शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

Satara: पाचगणीतील टेन्ट हाऊसवर पोलिसांचा छापा, बारबालांसह ३३ जणांवर कारवाई

By दीपक शिंदे | Updated: February 19, 2024 15:23 IST

पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथे टेंट हाऊसमध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर पाचगणी पोलिसांनी छापा टाकून १२ बारबालांसह डाॅक्टर, व्यापारी, ...

पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथे टेंट हाऊसमध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर पाचगणी पोलिसांनी छापा टाकून १२ बारबालांसह डाॅक्टर, व्यापारी, उद्योजक, विक्रेते अशा ३३ जणांना ताब्यात घेतले. यातील बहुतांश संशयित हे सोलापूर, पंढरपूर येथील असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई दि. १९ रोजी रात्री सव्वाबारा वाजता करण्यात आली.पाचगणीपासून जवळच असलेल्या खिंगर येथे ‘टेंट हाऊस’ नावाचे हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये डान्सबार सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून रात्री सव्वाबारा वाजता ‘टेंट हाऊस’वर छापा टाकला. त्यावेळी १२ बारबाला तोकड्या कपड्यात गिऱ्हाईकांसमोर उभ्या राहून बीभत्स हावभाव करून त्यांच्याशी लगट करत हाेत्या. तर काहीजण बारबालांसोबत नृत्य करत होते. पोलिस आल्याचे समजताच चार पुरुष तेथून पळून गेले.पोलिसांनी हाॅटेल मालक डाॅ. विजय रघुनाथ दिघे यांच्यासह २१ पुरुष आणि १२ बारबालांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, तसेच अलिशान गाड्या जप्त केल्या. या सर्वांवर विविध कलमांन्वये पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘हे’ होते बारबालांचे गिऱ्हाईक..भैरवनाथ चंद्रकांत चवरे (वय ३७, रा. पेनुर, ता. मोहळ, जि. सोलापूर), विजय रघुनाथ दिघे (वय ४६, रा. खिंगर, ता. महाबळेश्वर, मूळ रा. आंबेघर तर्फे कुडाळ, ता. जावळी), गिरीष एकनाथ देवकते (वय ३४, रा. धानोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), विकास बाबासाहेब चव्हाण (वय २५, रा. मोहोळ, जि. सोलापूर), सचिन सुधाकर वावकर (वय ४६, रा. धानोरी रोड, पुणे), सूरज दिगंबर कुंभार (वय २२, रा. वाकीशिवनी, ता. सांगोला, जि. सोलापूर), बाबासाहेब बाबुराव सलगर (वय ४८, रा. सादेपूर पो. निंबरगी, ता. दक्षिण सोलापूर), गणेश शिवाजी सरगर (वय २२, रा. उदयनवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), रवी भैरू खनट (वय ३३, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर), सदानंद विठ्ठल देवकाते (वय ३८, रा. सादेपूर, जि. सोलापूर), प्रदीप बापू खांडेकर (वय ३२, रा. शेंडगेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विजय श्रीमंत नागने (वय ३८, रा. कोंढरकी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), कैलास रामचंद्र गुरवे (वय ३७, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), आण्णा नाना पडळकर (वय ५५, रा. आटपाडी, जि. सांगली), संजय वसंत सोनवणे (वय ४६, रा. पाथर्डी फाटा, नाशिक), गणेश हणमंत कर्नावर (वय ३२, रा. भोईरे, ता. मोहोळ, जि. सोलापूर), नंदकुमार श्रीरंग शिंदे (वय ४८, रा. मसली चाैक, ता. मोहोळ, जि. सोलापूर), महेश दत्तात्रय खरात (वय २६), गणेश नामदेव पुजारी (वय ३३, रा. सोनके सोलापूर, ता. पंढरपूर) या २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस