शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाचगणीत डॉक्टरांच्या हाय प्रोफाइल पार्टीवर पोलिसांचा छापा; चार नर्तिकांसह १३ जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 11:44 IST

पाचगणी : भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून १३ जणांवर ...

पाचगणी : भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून १३ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चार नर्तिका आणि सहा डॉक्टरांचा समावेश आहे. ते सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. यातील नऊ जणांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर काही युवती तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नृत्य करीत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आँचल दलाल यांना मिळाली. त्यांनी तातडीने साताऱ्यावरून विशेष पथक तिकडे पाठविले. पोलिस पथक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर पोहोचले. त्यावेळी या रिसॉर्टच्या तळमजल्यात नतर्कींचे नृत्य सुरू होते. त्यांच्यासमोर सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तकींच्या समोर झिंगत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी चार नर्तिका, सहा डॉक्टर, एक फार्मासिस्ट आणि रिसॉर्ट चालकासह तेरा जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. चार नर्तिकांना नोटीस देवून सोडून देण्यात आले.विशाल सुरेश शिर्के (वय ३६, व्यवसाय हॉटेल, रा. पसरणी, ता. वाई), उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (वय ३१, व्यवसाय वेटर, राहणार स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट, कासवंड, ता. महाबळेश्वर, मूळ राहणार पाती तालुका गुड, जिल्हा रिवा, मध्य प्रदेश), डॉ. रणजीत तात्यासाहेब काळे (वय ४२, रा. बाजार पटांगण, दहिवडी, ता. माण, जि. सातारा), डॉ. नीलेश नारायण सन्मुख (वय ३९, रा. लक्ष्मी मार्केट, मिरज, ता. मिरज, जि. सांगली), प्रवीण शांताराम सैद (वय ४०, व्यवसाय फार्मासिस्ट, राहणारा आलडीया, माळुंगे पाडळे, ता. मुळशी, जिल्हा पुणे), डॉ. मनोज विलास सावंत (वय ४०, रा. जयवंत नगर, दहिवडी, ता. माण, जि. सातारा), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (वय ४०, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा), डॉ. राहुल बबन वाघमोडे (वय ३१, रा. गोंदवले, ता. माण, जि. सातारा), डॉ.हनुमंत मधुकर खाडे (वय ६५, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) अशा नऊ जणांवर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे यांनी पाचगणी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पाचगणी पोलिस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.आरोग्य क्षेत्रात खळबळया कारवाईत सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दहिवडी, कराड, मिरज, सातारा व पुणे येथील हे डॉक्टर आहेत. यामुळे या हाय प्रोफाइल पार्टीची चर्चा दिवसभर सुरू आहे.

महिला प्रतिष्ठा संरक्षण कलमानुसार गुन्हा

पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूममधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंधक घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ च्या कलम ३,८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसdoctorडॉक्टर