पोलिस अधिकारी युवराज हांडे अखेर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:16 IST2017-09-02T18:16:26+5:302017-09-02T18:16:26+5:30

सातारा : जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सक्तीच्या रजेवर पाठविलेले वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे हे अखेर हजर झाले.

Police officer Yuvraj Hande has arrived | पोलिस अधिकारी युवराज हांडे अखेर हजर

पोलिस अधिकारी युवराज हांडे अखेर हजर


सातारा : जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सक्तीच्या रजेवर पाठविलेले वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे हे अखेर हजर झाले.


आमदार शंभूराज देसाई यांच्या गाडीची फिल्मिंग काढल्याचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी युवराज हांडे यांना दहा दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविले होते. हांडे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

आमदार शंभूराज देसाई यांनी राजकीय दबाव वापरून हांडेंना सक्तीच्या रजेवर पाठविल्याचेही बोलले जात होते. हांडे यांच्या जागी पूर्वी वाहतूक शाखेत काम केलेले सुरेश घाडगे यांची तात्पुरती नियुक्ती केली होती. हांडे यांची सक्तीची रजा जिल्हा पोलिस दलात चर्चेचा विषच ठरली होती.


दरम्यान, दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर युवराज हांडे पोलिस मुख्यालयात हजर झाले आहेत. मात्र, अद्याप त्यांना वाहतूक शाखेचा पदभार दिला गेला नाही.

 

Web Title: Police officer Yuvraj Hande has arrived