शिरवळला मिळालं हक्काचं पोलीस ठाणे!

By Admin | Updated: August 14, 2015 21:49 IST2015-08-14T21:49:11+5:302015-08-14T21:49:11+5:30

आज शुभारंभ : खंडाळा ठाण्याच्या अखत्यारीत आता २७ गावे

Police officer arrested at Shirwal! | शिरवळला मिळालं हक्काचं पोलीस ठाणे!

शिरवळला मिळालं हक्काचं पोलीस ठाणे!

सातारा : खंडाळा तालुक्यातील शिरवळला हक्काचं पोलीस ठाणे मिळाले आहे. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते शनिवारी (दि. १५) होणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शिरवळ पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे खंडाळा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील तीस गावांचा समावेश शिरवळ ठाण्याच्या हद्दीत होणार असून, खंडाळा ठाण्याच्या हद्दीत २७ गावे उरणार आहेत. शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरवळ, भादे, पळशी, अतीट, भोळी, भाटघर, धनगरवाडी, गावडेवाडी, गुठाळे, कान्हवडी, कवठे, केसुर्डी, लोणी, मिरजे, मिरजेवाडी, नायगाव, पिसाळवाडी, राजेवाडी, शिंदेवाडी, शेखमीरवाडी, सांगवी, तोंडल, वडगाव, विंग, वडवाडी, हरताळे, होडी, माने कॉलनी, साळव (पुनर्वसन), देवघर (पुनर्वसन) या गावांचा समावेश आहे.
खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्नवाडी, जवळे, लोहोम, घाडगेवाडी, झगलवाडी, लिंबाचीवाडी, भादवडे, शिवाजीनगर, बावडा, पारगाव, खंडाळा, म्हावशी, वाण्याचीवाडी, अजनुज, अंबारवाडी, असवली, पवारवाडी, भोसलेवाडी, बेंगरुटवाडी, कन्हेरी, मोरवे, अहिरे, धावडवाडी, हरळी, घाटदरे, वहागाव (पुनर्वसन) अहिरे, वहागाव (पुनर्वसन) अजनुज या गावांचा समावेश आहे.
समारंभास खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आ. आनंदराव पाटील, आमदार महादेव जानकर, आमदार नरेंद्र पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)..

ताण होणार कमी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी बोगदा, घाट परिसरात वारंवार अपघात घडत होते. त्यामुळे खंडाळा पोलीस ठाण्यात ताण येत होता. अपुरे मनुष्यबळ यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी शिरवळला स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, अशी मागणी वारंवार होत होती. यामुळे आता ताण कमी होणार आहे.

Web Title: Police officer arrested at Shirwal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.