पोलीस निरीक्षकांचा मोबाईल चोरणारा सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:47+5:302021-09-05T04:44:47+5:30
सातारा : येथील मुख्यालयासमोरील ऑफिसर क्लबमधून पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांचा मोबाईल चोरणारे दोघेजेण अवघ्या पाच तासांत पोलिसांच्या जाळ्यात ...

पोलीस निरीक्षकांचा मोबाईल चोरणारा सापडला
सातारा : येथील मुख्यालयासमोरील ऑफिसर क्लबमधून पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांचा मोबाईल चोरणारे दोघेजेण अवघ्या पाच तासांत पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी केली.
गजानन दत्तात्रय शिंदे (वय २७, रा. मल्हार पेठ, सातारा), शुभम विश्वास अडागळे (वय २३, रा. माजगावकर माळ, शाहूपुरी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक अशोक पाटील हे पोलीस मुख्यालयासमोरील ऑफिसर क्लबमध्ये वास्तव्यास आहेत. बुधवार, दि. १ रोजी दुपारी बाराच्यासुमारास त्यांनी त्यांचा मोबाईल खोली क्रमांक तीनमध्ये चार्जिंगला लावला होता. काहीवेळानंतर त्यांचा २५ हजार रुपयांचा महागडा मोबाईल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर लोकेशनद्वारे
मोबाईल सुरू झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी माजगावकर माळ येथे धाव घेऊन शुभम अडागळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाैकशी केल्यानंतर त्याने आपण हा मोबाईल गजानन शिंदे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी गजाननलाही ताब्यात घेतले. त्यानेच हा मोबाईल ऑफिसर क्लबमधून चोरला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवघ्या पाच तासांत पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोबाईलचा छडा लावला. याबाबत अधिक तपास हवालदार अजित जगदाळे करत आहेत.