शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

मुलींच्या एका कॉलवर पोलीस धावणार मदतीला, छेडछाड रोखण्यासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिला मोबाईल नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:09 IST

शाळा, महाविद्यालय परिसरात युवतींची छेडछाड सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असते. हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा पोलिसांनी शाळा व महाविद्यालय संवाद अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खिशात

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांच्या खिशात पोलीसदादांचा नंबर, अधीक्षकांकडून रक्षाबंधनची भेट : छेडछाड रोखण्यासाठी उपक्रम

स्वप्नील शिंदे ।सातारा : शाळा, महाविद्यालय परिसरात युवतींची छेडछाड सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असते. हे प्रकार थांबविण्यासाठी आता जिल्हा पोलिसांनी शाळा व महाविद्यालय संवाद अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खिशात पोलीसदादाचा नंबर असणार आहे. त्यांच्या एका कॉलवर पोलीस त्यांच्या मदतीला धावण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मुलींना रक्षाबंधनची एकप्रकारेच भेट दिली आहे.

शाळा, महाविद्यालयाबाहेर टवाळखोर तरुण विनाकारण फिरत असतात. हे टवाळखोर मुलं मुलींची छेड काढतात. शाळेत जाताना, घरी येताना मुलींना त्रास देतात. मात्र, त्यांना समजून सांगणारे पालक, शाळेतील शिक्षक यांना मारहाण होते. याप्रकरणी गुन्हेही नोंदविले जातात. छेडछाडीच्या अशा घटनांनंतर पोलीस काही दिवस शाळांबाहेर गस्त घालून टवाळखोरांवर कारवाई करतात. त्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबतात; पण पुन्हा सुरू होतात. हे चित्र बदलण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा व महाविद्यालयात संवाद अभियान सुरू केले आहे.यावेळी मुलींबरोबर संवाद साधून पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक मुलींना देण्यात आले. जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी धावडशी, वर्ये परिसरांतील शाळेत या संवाद अभियानाची सुरुवात केली आहे.छेडछाड करणाºयांची गय नाही : देशमुखमुलींनी तक्रार केल्यानंतर संबंधित पोलीस तत्काळ तक्रारीची दखल घेऊन मुलीला त्रास देणाºयावर कारवाई करतील. त्याचबरोबर निर्भया पथकाची गस्त नियमितपणे सुरूच राहणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

एका कॉलवर पोलीस धावणार मदतीलाप्रत्येक मुलीजवळ पोलिसाचा नंबर देण्यात आला आहे. मुलीने तक्रार केल्यानंतर काही वेळातच पोलीस कर्मचारी मदतीला जातील, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. सर्व विद्यार्थ्यांजवळ पोलिसांचे मोबाईल नंबर असल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये वचक बसले. त्यामुळे छेडछाडीचे प्रकार साहजिकच रोखले जातील, अशी आशा पोलिसांना आहे.व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे पोलिसांची नजरछेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी शाळा व्यवस्थापन अन् पोलीस प्रयत्न करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी आपले मोबाईल नंबर विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक शाळेचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्याच्या माध्यमातून पोलिसांची सर्व घडामोडींवर नजर राहणार आहे.

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस