सातारा : शहर आणि आजूबाजूच्या परिसरात महिलांच्या सुरक्षितेतसाठी पोलीस दल प्रयत्न करत आहे. मात्र, अनेकदा राजकीय मंडळी तसेच मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. परिणामी पोलीस यंत्रणा त्याठिकाणी कार्यान्वित करावी लागते. परिणामी अनेकदा पोलीस बळ कमी पडते आणि हीच डोकेदुखी असल्याचे अनेकदा समोर आले आहे.सातारा शहरात नागरिकीकरणाची प्रक्रिया वेगाने वाढत असल्यामुळे अर्थकारणाचा स्तरही उंचावला आहे. त्यातच येथे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. या महिलांना एसटी बस असो. रिक्षास्टॉप असो, अथवा कोणत्याही स्थानकात बसची वाट पाहताना उभे राहिल्यानंतर येणारे अनुभव फारसे चांगले नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेतचा मोठा विषय आहे. (प्रतिनिधी)केंद्र आणि राज्य शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय कडक कायदे केले आहेत. मात्र, अनेकदा तक्रारदार महिला पुढे येत नाहीत. अर्थातच त्यापाठीमागे कुटुंबही तितकेच जबाबदार राहते. कारण भीतीमुळे कुटुंब तक्रार द्यायला पुढे येत नाही. आम्ही आमच्या पातळीवर शंभर टक्के प्रयत्न करत असतो. - संतोष पांढरे,- वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पोलीस बळ कमी हीच मोठी डोकेदुखी
By admin | Updated: January 23, 2015 23:37 IST