शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सातारा येथील पोलिसाने गोळी झाडून स्वत:लाच संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:30 IST

कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी कोळकेवाडी येथे बंदोबस्ताचे काम करणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी सोमवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पाटील हे सातारा येथील असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून पुढे आलेले नाही. मात्र त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसातारा येथील पोलिसाने गोळी झाडून स्वत:लाच संपवलेचिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील घटना

शिरगाव : कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी कोळकेवाडी येथे बंदोबस्ताचे काम करणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी सोमवारी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पाटील हे सातारा येथील असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून पुढे आलेले नाही. मात्र त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.कोयनेच्या चौथ्या टप्प्यामध्ये कोळकेवाडी येथे इमर्जन्सी व्हॉल्ट टनेल आहे. तेथे शिरगाव पोलीस स्थानकाकडून बंदोबस्त ठेवला जातो. बंदोबस्ताच्या पोलिसांची राहण्यासाठी तेथेच राहण्याची व्यवस्था आहे. सातारा येथील सुनील पाटील हे गेली चार वर्षे शिरगाव (ता. चिपळूण) पोलीस स्थानकात कार्यरत आहेत. ते सध्या कोळकेवाडी टनेल येथे कार्यरत होते.सोमवारी दुपारी २.३0 वाजण्याच्या सुमारास वीज मंडळाचे सुरक्षा रक्षक तेथे गेले. पाटील यांच्या खोलीचा दरवाजा नुसता ढकललेला असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला असता आतमध्ये पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या हातात त्यांची बंदूक होती. हे दृष्य पाहून त्या सुरक्षा रक्षकांनी शिरगाव पोलिसांशी संपर्क साधला.

पोलीस घटनास्थळी रवाना झाले. मात्र पोलीस सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळीच असल्याने अधिक तपशील उपलब्ध झाला नाही. आत्महत्येचे नेमके कारणही अजून पुढे आलेले नाही. शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर