शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक पुढे येऊ लागले, पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले; साताऱ्यात उडाली खळबळ, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:51 IST

सातारा : राजवाडा बसस्थानकात घोषणा देत आंदोलक पुढे येऊ लागले. हे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडून जमाव पांगविला. हे ...

सातारा : राजवाडा बसस्थानकात घोषणा देत आंदोलक पुढे येऊ लागले. हे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडून जमाव पांगविला. हे खरोखरचं आंदोलन नसून, पोलिसांनी प्रात्यक्षिक केल्याचे समजल्यानंतर बघ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी म्हणून पोलिसांनी शहरात रुट मार्च आणि दंगा नियंत्रणाचा सराव केला. मात्र, या सरावावेळी राजवाडा बसस्थानक परिसरात खळबळ उडाली.पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस, शाहूपुरी पोलिस, वाहतूक शाखा आणि होमगार्ड राजवाडा बसस्थानकात सोमवारी दुपारी साडेबारा वाजता दाखल झाले. सरावासाठी पोलिसांनी तेथील नागरिकांना आंदोलकांची भूमिका निभावण्याची विनंती केली. सुरुवातीला कोणीही तयार नव्हते; मात्र ‘माध्यमामध्ये फोटो येतील’ या गंमतीमुळे काही नागरिक घोषणाबाजीसाठी पुढे सरसावले. सरावादरम्यान अग्निशामक दलाच्या बंबातून पाण्याचा फवारा मारण्यात आला आणि लगेचच अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. अचानक पसरलेल्या धुरामुळे आंदोलकांच्या डोळ्यांत पाणी आले, चेहऱ्यावर जळजळ झाली. पोलिसांची आंदोलकांवरील कारवाई नेमकी कशी असते, याचा प्रत्यय या प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्या नागरिकाला आला.दरम्यान, या प्रात्यक्षिकानंतर रुट मार्च काढण्यात आला. हा रुट मार्च गोलबाग, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेट्ये चौक, पाचशे एक पाटी मार्गे पुन्हा राजवाडा बसस्थानकापर्यंत काढण्यात आला.